Bike Jugad Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Bike Jugad Viral Video: सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही दररोज काहीतरी नवीन, आगळेवेगळे आणि तुम्ही कधी विचारही केला नसेल अशा गोष्टी पाहू शकता.

Manish Jadhav

Bike Jugad Viral Video: सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही दररोज काहीतरी नवीन, आगळेवेगळे आणि तुम्ही कधी विचारही केला नसेल अशा गोष्टी पाहू शकता. लोकांच्या खुराफती आणि कल्पक विचार कसे असतात, हे जाणून घेण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर तासन्तास घालवतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक 'अतरंगी जुगाड' व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

आधी हा व्हिडिओ पाहा!

तुम्ही आतापर्यंत दुचाकीवरुन लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रवास करताना पाहिले असेल. अनेक जण स्टंट करतात, तर काही जण धोकादायक पद्धतीने प्रवास करतात. पण, सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने दुचाकीवर केलेला जुगाड 'अल्ट्रा प्रो मॅक्स' प्रकारातला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुचाकीवर आरामशीर झोपलेला दिसत आहे. त्याने हा जुगाड करण्यासाठी काय केले आहे, हे जाणून घेणे रंजक आहे.

या व्यक्तीने दुचाकीच्या मागच्या सीटवर एक छोटीशी खाट व्यवस्थित दोरीने बांधली. त्यावर अंथरुण आणि बिछाना लावून त्याने स्वतःसाठी आरामदायी जागा तयार केली. इतकेच नव्हे, तर त्याने पूर्ण तयारी करुन मच्छरदाणी देखील लावली, जेणेकरुन त्याला कशाचाही त्रास होणार नाही. या सगळ्या तयारीनंतर दुसरा एक व्यक्ती ती दुचाकी चालवत आहे आणि हा 'झोपाळू' माणूस रस्त्यावरुन आरामात प्रवास करत आहे. हा सगळा प्रकार 'रील' बनवण्यासाठी केला गेला असावा. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

हा व्हायरल व्हिडीओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर @sankii_memer नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

  • एक युजर कमेंट करताना म्हणाला, "याला झोपेतूनच उठवून घेऊन आले आहे, याचा जिगरी दोस्त."

  • दुसऱ्या युजरने लिहिले, "खतरनाक जुगाड आहे हा!"

  • तिसऱ्या युजरने गंमत करत लिहिले, "झोपणे ही एक कला आहे."

  • चौथ्या युजरने तर 'झोप खूप महत्त्वाची आहे' असे सांगून या जुगाडाचे समर्थन केले.

  • एका अन्य युजरने "वाह यार, हे तर बेस्ट आहे," अशी प्रतिक्रिया दिली.

हा अतरंगी जुगाड लोकांना प्रचंड आवडला असून भारतीय जुगाडू वृत्तीचे हे आणखी एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT