

महाराष्ट्र: नवीन कार खरेदी करणं हे अनेकांचे स्वप्न असते. नवीन कारला किमान एक - दोन वर्षे तरी दुरुस्तीचा खर्च येऊ नये अशीही अपेक्षा असते. पण, समजा नवी काही खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच बंद पडली तर? कोणालाही त्याचा मोठा मनस्ताप होईल यात शंका नाही. दरम्यान, हा मनस्ताप बोचऱ्या पद्धतीने व्यक्त केल्याचा एक प्रकार नुकताच महाराष्ट्रात उघडकीस आला आहे.
झालं असं की एका व्यक्तीने शोरुममधून नवी कोरी थार ही महिंंद्रा कंपनीची प्रसिद्ध कार विकत घेतली. पण, खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच ही कार बंद पडली. कार मालकाने याबाबत शोरुमकडे तक्रार नोंदवली, पण शोरुमने त्याची दखल घेतली नाही, असा आरोप मालकाने केला आहे.
वारंवार केलेल्या तक्रारीकडे दुर्लेक्ष केल्यानंतर संतप्त झालेल्या मालकाने थेट थार गाढवांना बांधून ढोल - ताशांच्या गजरात शोरुमपर्यंत ओढत नेली. काळ्या रंगाच्या नव्या थारला दोन गाढवं बांधली असून, ती गाढवं थारला ओढत आहेत. तर, त्यांच्या पुढे ढोल - ताशा वाजवला जात आहे. कारवर दोन बॅनर देखील बांधण्यात आले आहेत.
थार गाढवांकरवी ओढत शोरुममध्ये घेऊन जात असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी अनेकजण उपस्थित असल्याचे दिसत आहे. समाज माध्यमावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी सम्रिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.