This is first Gram Panchayat in India to ban officers from calling Sir, Madam Dainik Gomantak
देश

Government Officersना 'सर-मॅडम' म्हणण्‍यास बंदी

हल्ली सर आणि मॅडम म्हणूनच आपण ऑफिसमध्ये किंवा अनोळखी ठिकाणी एकमेकांना हाक मारत असतो

दैनिक गोमन्तक

पल्लकड: सरकारी कार्यालयात (Government Office) गेल्यावर तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘सर’ किंवा ‘मॅडम’ (Sir or Madam) म्हणून संबोधन बहुतेकांच्या सवयीचे झाले आहे. पण उत्तर केरळमधील (Kerala) पल्लकड जिल्ह्यातील माथुर गावाच्या ग्रामपंचायतीने (Mathur Gram Panchayat) एक वेगळाच नियम तयार केलाय. केरळमधील माथुर कार्यालय परिसरात ‘सर’ आणि ‘मॅडम’ या शब्दांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

हल्ली सर आणि मॅडम म्हणूनच आपण ऑफिसमध्ये किंवा अनोळखी ठिकाणी एकमेकांना हाक मारत असतो, मात्र उत्तर केरळमधील माथुर ग्रामपंचायत त्याला अपवाद ठरली आहे. या परिसरातील अधिकाऱ्यांना नावाने किंवा त्यांच्या पदाने संबोधित करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. सर-मॅडम संबोधनांचा वापर थांबविणारी केरळमधील माथुर ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्यातील पद प्रतिष्ठेची सीमारेषा पुसून टाकण्यासाठी माथुर ग्रामपंचायतीने ‘सर’ आणि ‘मॅडम’ या संबोधनांवर बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. माथुरच्या या ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे अनुकरण अन्य ग्रामपंचायती करणार असल्याचीही चर्चा आहे.

"माथुर ग्रामपंचायत कार्यालयात सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कामासाठी येत असतात. त्यांच्यात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये औपचारीक संभाषण न होता हे संभाषण दडपणाखाली न होता एकमेकांना समजेल असं कराता यावं आणि त्यांच्यातील वरिष्ठ कनिष्ट पदातील अंतर कमी व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यात मैत्रीची भावना निर्माण होईल आणि सहज आणि साध्या पद्धतीने ते संभाषण करू शकतील. सर आणि मॅडम हे शब्द सामान्य व्यक्ती आणि सरकारी आधिकाऱ्यांमध्ये अंतर निर्माण करते. लोकशाहीत जनता ही खरी मालक असते. प्रशासन त्यांच्या सेवेसाठी असते. त्यामुळे सरकारी व्यक्तींना सन्मान देण्यासाठी सर किंव मॅडम म्हणून संबोधण्याची गरज नाही," असे माथुरचे उपसरपंच पी.आर. प्रसाद यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT