Arun Yogiraj|Ram Mandir|Ayodhya Dainik Gomantak
देश

लाखोंची नोकरी सोडली आणि शिल्पकार झाले, गोष्ट रामलल्लाची मूर्ती बनवणाऱ्या Arun Yogiraj यांची

Who is Arun Yogiraj: पण अचानक अरुण यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून वडिलोपार्जित काम हाती घेतले. परिणामी, आज अरुण हे देशातील प्रसिद्ध शिल्पकार आहेत.

Ashutosh Masgaunde

The story of Arun Yogiraj, who made the idol of Lord Ram in Ram Mandir Ayodhya, quit his job of lakhs and became a sculptor:

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. मंदिरात बसवण्यात येणाररी रामलल्लाची मूर्ती तयार आहे. यासाठी 3 शिल्पकारांच्या शिल्पांपैकी एकाची निवड करण्यात आली आहे.

रविवारी झालेल्या राम मंदिर न्यासाच्या बैठकीत मूर्ती सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, म्हैसूर (कर्नाटक) येथील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली रामलल्लाची मूर्ती राम मंदिरात बसवण्याची घोषणा करण्यात आली.

ही मूर्ती 51 इंच रूंद आणि सुमारे 8 फूट उंच आहे, ज्यामध्ये रामलल्ला बाल रूपात दिसतात. राम मंदिरात कमळाच्या फुलावर रामलल्ला विराजमान होणार आहेत. ही मूर्ती कर्नाटकातील निळ्या दगडापासून बनवण्यात आली आहे.

कोण आहे अरुण योगीराज?

'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, रामलल्लाची मूर्ती बनवणारे 37 वर्षीय अरुण योगीराज हे कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत.

अरुण यांनी 2008 मध्ये म्हैसूर युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले आणि एमएनसीमध्ये नोकरी केली.

पण अचानक अरुण यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून वडिलोपार्जित काम हाती घेतले. परिणामी, आज अरुण हे देशातील प्रसिद्ध शिल्पकार आहेत. त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनी वाडियार घराण्याचे वाडे कोरले होते.

अरुण यांनी याआधीच सुभाषचंद्र बोस यांचा ३० फूट उंच पुतळा तयार केला आहे, जो इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे भव्य छताखाली स्थापित केला आहे.

याशिवाय अरुण यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची १२ फूट उंचीची मूर्तीही बनवली होती.

अरुण योगीराज यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान

दिल्लीत सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण योगीराज यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

अरुण योगराज यांना म्हैसूर जिल्हा प्रशासनाकडून नलावडी पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आला. 2021 पासून, ते कर्नाटकच्या क्राफ्ट्स कौन्सिलचे सदस्य आहेत.

2014 मध्ये, त्यांना भारत सरकारने साऊथ थॉन यंग टॅलेंटेड आर्टिस्ट पुरस्कार दिला. शिल्प संघटनेतर्फे त्यांना शिल्प कौस्तुभ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

म्हैसूर जिल्हा प्रशासनाकडून त्यांना राज्योत्सव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला आहे. म्हैसूर स्पोर्ट्स अकादमीनेही त्यांचा गौरव केला आहे. अरुण यांचा अमर शिल्पी जकनाचार्य ट्रस्टनेही गौरव केला आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक शिल्प शिबिरांमध्ये ते सहभागी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT