Sidhu Moosewala Dainik Gomantak
देश

सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचे गूढ उकलण्यासाठी एसआयटीची पुनर्रचना

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसवालाच्या हत्येची उकल करण्यासाठी मंगळवारी एसआयटीची स्थापना करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसवालाच्या हत्येची उकल करण्यासाठी मंगळवारी एसआयटीची स्थापना करण्यात आली. आता या तपास पथकात काही बदल करण्यात आले आहेत. पंजाबचे डीजीपी व्हीके भवरा यांनी सांगितले की, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची (SIT) पुनर्रचना करण्यात आली आहे. 6 सदस्यीय SIT मध्ये, नवीन अध्यक्ष IGP PAP जसकरण सिंह आणि दोन नवीन सदस्य AIG AGTF गुरमीत सिंह चौहान आणि SSP मानसा गौरव तोरा यांचा समावेश करण्यात आला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला राज्यात आणल्यानंतर चौकशी केली जाईल. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा हात होता. या हल्ल्याप्रकरणी सध्या लॉरेन्स बिश्नोई दिल्ली (Delhi) पोलिसांच्या स्पेशल सेलच्या ताब्यात आहे. पंजाबमधील (Punjab) मानसा जिल्ह्यात रविवारी प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस (Congress) नेते सिद्धू मुसेवालाची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. एक दिवस आधी पंजाब सरकारने मुसेवालाची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT