सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पहिली अटक, पोलिसांनी आरोपीला घेतले 5 दिवसांच्या रिमांडवर

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे.
Sidhu Musewala
Sidhu MusewalaDainik Gomantak
Published on
Updated on

Sidhu Moose Wala Murder Case: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणी मनप्रीत नावाच्या व्यक्तीला अटक केली होती, त्याला काल उत्तराखंडमधून पकडण्यात आले. मनप्रीतला आज न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, याप्रकरणी मनप्रीतची भूमिका काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी स्पेशल सेल टीमने लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली आणि एका जुन्या प्रकरणात त्याला तुरुंगातून ताब्यात घेतले. कोर्टामार्फत त्याच्या कोठडीसाठी अर्ज करण्यात आला होता. आता लॉरेन्स बिश्नोई स्पेशल सेलच्या ताब्यात आहे, लॉरेन्सचे नाव मुसेवालाच्या हत्येशी जोडले गेले आहे. याप्रकरणी लॉरेन्सची आता स्पेशल सेल कोठडीत चौकशी केली जाणार आहे. याशिवाय काला जथेडी आणि कला राणा हे अन्य काही प्रकरणात स्पेशल सेलच्या ताब्यात आहेत. दिल्ली पोलिसांची स्पेशल विंग आता तिघांची चौकशी करणार आहे.

पंजाब पोलिसांनी रविवारी सांगितले की, सिद्धू मूसवालाची हत्या दोन गटातील परस्पर वैमनस्यातून झाली. त्यात लॉरेन्स बिश्नोईने कट रचला होता. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी मुसेवालाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्याच्या एक दिवस आधी राज्य सरकारने त्याची सुरक्षा कमी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

FIA India Day Celebration New York 2026
Sudhanshu Trivedi Slams P Chidambaram Dimagi Naxal
Kanpur Pregnant Woman Suspicious Death
DA Hike
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com