Indian Navy Day Dainik Gomantak
देश

Indian Navy Day: 'ही' आहे नौदलाची पॉवर, वाचा भारतीय नौदलाकडे किती आहे युध्द सामग्री

भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

गोमन्तक डिजिटल टीम

१७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते. त्यानंतर इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) ची स्थापना केली. भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजय मिळवता आला. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

देशाला लाभलेली पूर्व आणि पश्चिम विस्तीर्ण किनारपट्टी, सागरी क्षेत्रातील बदलती आव्हाने, चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण होणारे धोके, व्यापारी मार्गांची सुरक्षा अशा अनेक कारणांनी नौदलाच्या दोन्ही विभागांकडे (पूर्व व पश्चिम) विमानवाहू नौका तसेच अद्ययावत युद्ध सामग्री असणे आवश्यक बनले. सध्या भारतीय नौदलाकडे खालील सामग्री असलेली आपल्याला पाहायला मिळते.

 भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या ‘आय.एन्.एस्. विक्रमादित्य’ ही विमानवाहू युद्धनौका असून त्यावर ‘मिग २९-के’ ही ३६ लढाऊ विमाने त्यावर सज्ज आहेत.  आता ‘पाणबुडी बचाव वाहन’ही नौदलाच्या पश्चिमी ताफ्यात आले आहे.  हिंदी महासागरातील चीनचा वाढता वापर भारतासाठी सर्र्वांत मोठी डोकेदुखी ठरत आहे. भारताने २६/११ च्या आक्रमणाच्या वेळी समुद्री मार्गाने येणारे संकट अनुभवले आहे. त्यानंतर नौदलानेही युद्धसज्जतेसमवेत संरक्षणावरही भर देण्यास आरंभ केला. नौदलाने पुढाकार घेत सागरी सुरक्षेशी संबंधित सर्व घटकांना एकत्र आणले. 

आयएनएस विक्रांतची रचना कशी?

४४ हजार टन वजनाची ही नौका वायू तंत्रज्ञानावर आधारित आहे. संयुक्त गॅस टर्बाईन प्रणालीतून ८० मेगावॉट वीज मिळते. त्यायोगे ती ताशी २८ सागरी मैल वेगात मार्गक्रमण करू शकते. सामान्य स्थितीत १८ सागरी मैल वेगाने ती प्रवास करेल, ज्यामुळे साडेसात ते आठ हजार सागरी मैलाचे अंतर पार करता येईल. २६२ मीटर लांब, ६२ मीटर रुंद आणि ५९ मीटर उंच असे तिचे अवाढव्य रूप आहे. तळभागाचे क्षेत्रफळ दोन फुटबॉल मैदानांइतके भरेल. १४ मजली नौकेच्या पायावर डोलारा सांभाळणारी पाच विशेष स्वरूपाची बांधकामे (सुपर स्ट्रक्चर्स) आहेत. १७०० जणांच्या चालक दलास डोळ्यासमोर ठेऊन २३०० निरनिराळे कप्पे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. यंत्रणा संचलन, दिशादर्शन, विमानासाठी खास वर्गीकृत केलेल्या जागा आहेत.

शस्त्रसज्जता, लढाऊ विमाने कोणती?

या विमानवाहू नौकेसाठी खास लढाऊ व्यवस्थापन प्रणालीही देशातच विकसित करण्यात आली. त्याद्वारे जहाजाचे संवेदक, शस्त्रे, माहितीच्या जोडण्या एकत्रित होऊन लढाऊ विभागाची जबाबदारी सांभाळणारे प्रभावीपणे कामगिरी करू शकतील. पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे बराक हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, एकाच मिनिटांत १२० गोळ्या डागणारी बंदूक, त्रिमितीय रडार यंत्रणा आदींनी सुसज्ज आहे. यातील काही आयुधांनी तिला जहाजविरोधी क्षेपणास्त्र आणि विमानांपासून स्वत:चे संरक्षण करता येईल.

हवाई हल्ल्यांपासून पूर्वसूचना देणारी यंत्रणा, दिशा दर्शनासाठी बहुपर्यायी व्यवस्था अशा अनेक यंत्रणांचा अंतर्भाव आहे. शत्रूच्या रडार यंत्रणेची दिशाभूल करण्याची क्षमता ती बाळगून आहे. साधारणत: ३० हलकी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टरचा ताफा तिच्यावर तैनात राहतील. दोन धावपट्ट्यांना कमी जागेत उड्डाण आणि विमान नियंत्रित करण्याच्या व्यवस्थेची जोड मिळाली आहे. सध्या नौकेवर रशियन बनावटीचे मिग-२९, कामोव्ह-३१, स्वदेशी बनावटीचे प्रगत हलके हेलिकॉप्टर कार्यरत आहे. २६ बहुउद्देशिय लढाऊ विमाने खरेदीचा विचार सुरू आहे. त्या अनुषंगाने अलीकडेच फ्रान्सच्या राफेल – एम आणि अमेरिकन बोईंगच्या एफ ए- १८ हॉर्नेट विमानांच्या चाचण्याही पार पडल्या.

प्रोजेक्ट 15बी क्लास गाईडेड मिसाईल विनाशिकेचे दुसरे जहाज म्हणजेच यार्ड 12705 भारतीय नौदलाकडे आहे. डीएमआर 249ए हे स्वदेशी पोलाद ही विनाशिका बांधण्यासाठी वापरले असून भारतात बांधलेली ही सर्वात मोठी विनाशिका आहे. याची एकूण लांबी 164 मीटर तर वजन 7500 टनांपेक्षा अधिक आहे. सागरी युद्धात विविध कार्ये आणि मोहिमा यशस्वी करण्यात ही विनाशिका सक्षम आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे स्वनातीत (सुपरसोनिक) ब्राम्होस क्षेपणास्त्र आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारे लांब पल्ल्याच्या "बराक8" क्षेपणास्त्राने ही विनाशिका सुसज्ज आहे.

समुद्राखालील युद्ध क्षमतेचा विचार करता यात स्वदेशी पाणबुडीविरोधी शस्त्रे आणि सेन्सर्स बसवलेले आहेत. विशेषत्वाने विनाशिकेच्या नांगरावर सोनार हम्सा एनजी, अवजड टॉर्पेडो ट्यूब लाँचर्स आणि एएसडब्लू रॉकेट लाँचर्स बसवले आहेत. नौदलातील आधीच्या विनाशिका आणि युद्धनौकांच्या क्षमतांपेक्षा ही लक्षणीयरीत्या अधिक अष्टपैलू आहे.

ही विनाशिका एकूण 312 कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ शकते, त्याची क्षमता 4000 नॉटिकल मैल आहे आणि ती नियोजित मोहिमेपेक्षा विस्तारित मोहिम वेळेसह ठराविक 42 दिवसांची मोहीम पार पाडू शकते. विनाशिकेची पोहोच आणखी वाढवण्यासाठी त्यावर दोन हेलिकॉप्टर आहेत. गीगाबाइट इथरनेट आधारित शिप डेटा नेटवर्क (जीईएसडीएन), युद्ध व्यवस्थापन प्रणाली (सीएमएस), ऑटोमॅटिक पॉवर मॅनेजमेंट सिस्टम (एपीएमएस) आणि इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (आयपीएमएस) यासारख्या अत्याधुनिक डिजिटल नेटवर्कसह विनाशिकेत उच्च दर्जाची ऑटोमेशन व्यवस्था आहे.

पी15बी वर्गाच्या विनाशिकेत 72% स्वदेशी सामग्री आहे. तिच्या पूर्वसुरींच्या म्हणजेच पी15ए (59%) आणि पी15 (42%) यांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे. पी15बी (विशाखापट्टणम) ही पहिली विनाशिका गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर 2021 रोजी कार्यान्वित झाली. तिसऱ्या विनाशिकेचे (इम्फाळ) जलावतरण 20 एप्रिल 2019 रोजी करण्यात आले होते आणि चौथ्या विनाशिकेचे (सुरत) जलावतरण 17 मे 2022 रोजी करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT