Temple premises cannot be used for mass drills or weapons training Dainik Gomantak
देश

शस्त्र प्रशिक्षणासाठी मंदिर परिसर वापरता येणार नाही, हायकोर्टाचे निर्देश

"आमच्या उपस्थितीमुळे भाविकांची गैरसोय होत असून ते मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे गर्भगृहाच्या देवत्वावर परिणाम होत असल्याचा आरोप निराधार आहे."

Ashutosh Masgaunde

The Kerala High Court has directed that the temple premises cannot be used for mass drills or weapons training:

सामूहिक कवायती किंवा शस्त्र प्रशिक्षणासाठी मंदिर परिसर वापरता येणार नाही, असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत. याचिका निकाली काढताना, न्यायालयाने पूर्वीच्या खंडपीठाच्या निकालाचा संदर्भ दिला ज्यामध्ये असे म्हटले होते की, मंदिरांमधील दैनंदिन पूजा, समारंभ आणि उत्सव आयोजित करण्यात राजकारणाची भूमिका नाही.

तिरुअनंतपुरममधील श्री सरकारा देवी मंदिरातील दोन भाविक आणि जवळपासच्या रहिवाशांनी सामूहिक कवायती आणि आरएसएसच्या कथित सदस्यांनी केलेल्या आरडाओरडामुळे मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना, विशेषत: महिला आणि मुलांना खूप त्रास होतो. याविरोधा याचिका दाखल केली होती.

एकल खंडपीठाचे न्यायाधीश अनिल के नरेंद्रन यांनी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाला मंदिराचा परिसर अशा प्रकारच्या कामांसाठी वापरला जाणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले.

या याचिकेत मंदिरात "शांततापूर्ण आणि शांत वातावरण" सुनिश्चित करण्यासाठी, 'गर्भगृहा'चे देवत्व टिकवून ठेवण्याची आणि त्याद्वारे घटनेच्या कलम 21 नुसार याचिकाकर्त्यांच्या "पूजेच्या अधिकाराचे" संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती.

दररोज संध्याकाळी 5.00 ते 12.00 या वेळेत सामूहिक कवायती आणि शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेणाऱ्या काहिंनी मंदिराच्या जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याने याचिकाकर्ते नाराज झाले होते.

न्यायालयाने सांगितले की, वस्तुस्थितीचा अभ्यास केल्यावर असे कळते की सामूहिक कवायती केली जात आहेत. देवस्वोम मंडळाच्या संमतीशिवाय असे उपक्रम राबवले जात असल्याची तक्रार मंदिराच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही आली होती.

पोलिस चौकशीत असे दिसून आले की, आरोप खरे आहेत आणि या प्रकरणातील प्रतिवादींना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर कवायतीचे काम थांबले. सध्या मंदिरात आणि आजूबाजूला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

प्रतिवादींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, विमल यांनी असे सादर केले की आरएसएस शाखा सामूहिक कवायती आणि शस्त्र प्रशिक्षण देत नाही. आमच्या उपस्थितीमुळे भाविकांची गैरसोय होत असून ते मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरामुळे गर्भगृहाच्या देवत्वावर परिणाम होत असल्याचा आरोप निराधार आहे.

दुसरीकडे, सेवा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मंदिराच्या उत्सवांमध्ये त्यांनी दिलेल्या सेवांचे भाविकांनी स्वागत केले. लावलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत.

"आरएसएस हा या खटल्यात पक्ष नाही. आमच्या दोन सदस्यांविरुद्ध वैयक्तिक म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोठेही आरएसएसला प्रतिवादी म्हणून जोडण्यात आलेले नाही," असे आरएसएस-केरळचे सरचिटणीस पी.एन. ईश्वर म्हणाले.

ते म्हणाले की, आरएसएसच्या शाखा सर्व मंदिर परिसरात आहेत, आम्ही कुठेही शस्त्र प्रशिक्षण देत नाही. आम्ही हिंदू विचारधारेवर चर्चा आणि प्रवचने देतो, असेही ते म्हणाले.

ईश्वर म्हणाले की, मंदिराच्या आवारात कवायती आणि शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणाला परवानगी देऊ नये, असे न्यायालयाने सर्वसाधारण निरीक्षण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT