Indian History Dainik Gomantak
देश

Freedom Fighter Took Revenge : आणि मग भगतसिंह आणि सहकाऱ्यांनी सॉंडर्स या ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या केली..

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारकांनी दिलेला सशस्त्र लढा एक महत्त्वाचे पर्व होते. आजच्याच दिवशी 1928 साली भगतसिंह आणि सहकाऱ्यांनी सॉंडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती.

Rahul sadolikar

Freedom Fighter: दिवस 17 डिसेंबर 1928. लाहोर पोलीस हेडक्वार्टरच्या बाहेर काही तरुण कुणाची वाट बघत होते. थोड्याच वेळात एक तरुण पोलीस अधिकारी दुचाकीवरुन पोलीस हेडक्वार्टरच्या बाहेर पडला. त्या आधिकाऱ्याला बघुन तरुण सावध झाले कारण त्यांना हवे असलेले सावज आता त्यांच्या बंदुकीच्या टप्प्यात आले होते.

क्षणाचाही विलंब न लावता त्या सावध तरुणांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावर चालवल्या. सलग तीन गोळ्या लागल्याने तरुण पोलीस अधिकारी जागीच ठार झाला. कोण होते ते तरुण? आणि का त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला मारलं? पोलीस हेड क्वार्टरसमोर एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळ्या झाडण्याचं धाडस त्यांच्यात कसं आलं?

तो पोलीस अधिकारी आणि ते तरुण कोण होते?

तो पोलीस अधिकारी होता लाहोरचा असिस्टंट पोलीस सुपरीटेंडेंट सॉंडर्स.आणि ते तरुण होते 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक आर्मी'चे तरुण क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद,राजगुरू,सुखदेव आणि शहिद- ए -आजम भगतसिंह.

खरतर या तरुण क्रांतिकारकांना सॉंडर्सला मारायचे नव्हते, त्यांना लाहोरचा सुपरीटेंडेंट ऑफ पोलीस स्कॉटला मारायचे होते. पण क्रांतिकारक राजगुरूला सॉंडर्स हाच स्कॉट आहे असं वाटल्यामुळे त्यांनी सॉंडर्सवर गोळ्या झाडल्या.

पण या तरुण क्रांतिकारकांना स्कॉटला का मारायचं होतं?

स्कॉटला मारण्याचा प्लॅन हा पंजाबचे सिंह म्हणुन ओळखले जाणाऱ्या लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला होता. स्कॉटच्या ऐवजी सॉंडर्सला जरी मारलं असलं तरी जुलूमी ब्रिटीश सत्तेला तो एक हादरा होता. भारतीय क्रांतीकारक आपल्या जिवाची पर्वा न करता एका बलाढ्य सत्तेला भिडु शकतात हे ब्रिटीशांनी पाहिलं.

ब्रिटिशांनी लाला लजपतराय यांना का मारलं?

1928 साली सायमन कमीशन भारतात आले. आणि त्याच्या विरोधात देशभर निदर्शनं सुरु होती. लाहोरमध्ये लाला लजपतराय या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. या कमिशनमध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता त्यामुळे या कमिशनला गोऱ्या लोकांचं कमीशन म्हटलं गेलं.

30 ऑक्टोबर 1928 रोजी लाहोरमध्ये झालेल्या आंदोलनात ब्रिटिशांनी लाठीहल्ला केला. यावेळी वयस्कर लाला लजपतराय यांना क्रुरपणे मारण्यात आलं. या मारहाणीत लाला लजपतराय गंभीर जखमी झाले आणि 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचा मृत्यु झाला.

आणि याच हत्येचा बदला 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक आर्मी'च्या चंद्रशेखर आझाद,राजगुरू,सुखदेव आणि शहिद- ए -आजम भगतसिंह या तरुण क्रांतिकारकांनी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT