Arvind Kejariwal And Bhagwant Mann  Dainik Gomantak
देश

Gujarat Assembly Election: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ची 12 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

आत्तापर्यंत 53 उमेदवार जाहीर; केजरीवाल, मान पुन्हा गुजरात दौऱ्यावर

गोमन्तक डिजिटल टीम

Gujarat Assembly Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम आदमी पक्षाने चांगलीच आघाडी घेतली आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सतत गुजरात दौरा करत आहेत. रविवारीही केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे गुजरात दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली.

आम आदमी पक्षाने ट्विटरवरून ही यादी जारी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारीच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या. पण गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने अद्याप तारखा घोषित केलेल्या नाहीत. गुजरात विधानसभेसाठीही याच वर्षी मतदान होण्याची शक्यता आहे. कदाचित 20 ऑक्टोबर रोजी आयोग या तारखा जाहीर करेल, असा अंदाज आहे.

तथापि, आम आदमी पक्षाने या आधी उमेदवारांच्या चार याद्या जाहीर करत आघाडी घेतली आहे. एकीकडे दिल्लीत अबकारी धोरणावरून विविध तपास यंत्रणांचा ससेमिरा आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या मागे लागलेला असताना 'आप'कडूनही गुजरात विधानसभा निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले जात आहे. त्यातूनच 'आप'ने आत्तापर्यंत 53 उमेदवार जाहीर केले आहेत.

उमेदवारांना लोकांमध्ये जाता येईल, आपले व्हिजन मांडता येईल, प्रश्न जाणून घेता येतील, यासाठी पुरेसा वेळ मिळेल, या उद्देशाने यादी जाहीर केली आहे, असे पक्षाने म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा नंतर केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी सांगितले.

'आप'ने यापुर्वी 6 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या चौथ्या यादीतदेखील 12 उमेदवारांची नावे घोषित केली होती. पहिल्या यादीत दहा, दुसऱ्या यादीत नऊ तर तिसऱ्या यादीत दहा उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

SCROLL FOR NEXT