Sitharaman On ED: 'ईडी' ही स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी स्वतंत्र संस्था

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले 'ईडी'च्या कारवायांचे समर्थन; राजकीय हेतूने वापर होत नसल्याचे स्पष्टीकरण
Finance Minister Sitharaman
Finance Minister SitharamanDainik Gomantak

Sitharaman On ED: देशातील राजकीय विरोधकांविरोधात सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) माध्यमातून जाणीवपुर्वक कारवाया करून त्रास दिला जात असल्याची टीका विरोधकांकडून गेल्या काही काळात वारंवार होत आहे. तथापि, आता स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच ईडी च्या कारवायांचे समर्थन केले आहे.

Finance Minister Sitharaman
Biden On Pakistan: अण्वस्त्रांवर नियंत्रण नसल्याने पाकिस्तान सर्वाधिक धोकादायक देश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अमेरिका दौऱ्यावर असून तिथे नुकतेच त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर मते व्यक्त केली. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी, सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वतःचे निर्णय घेण्यासाठी पुर्णतः स्वतंत्र आहे, ती एक स्वतंत्र संस्था आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले.तपास यंत्रणांचा राजकीय दृष्ट्या वापर केला जात असल्याचे त्यांनी साफ नाकारले. तसेच ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईचे समर्थनही केले.

ईडी आणि प्राप्तीकर विभागाविषयीच्या प्रश्नावर सीतारामन म्हणाल्या की, ईडी जेव्हा एखाद्या प्रकरणात लक्ष घालते तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, त्या केसचा तपास आधीच इतर कुठलीतरी एजन्सी करत आहे. मग ती संस्था सीबीआय असेल किंवा इतर कुठली एजन्सी. पण राजकीय नेत्यांच्या टीकेचे लक्ष्य नेहमी ईडीच ठरते. ईडी कधीही गुन्ह्याच्या घटनास्थळी पहिल्यांदा जात नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. ईडी जेव्हा कुठे जाते तेव्हा जप्त केलेले पैसे, दागिने आणि सोने यामुळे त्यांना प्रसारमाध्यमांत चांगले कव्हरेज मिळते, असे त्यांनी सांगितले.

Finance Minister Sitharaman
Virat's Fan Murder Rohit's Fan: विराट श्रेष्ठ की रोहित? RCB फॅनकडून MI फॅनचा खून

सीतारामन म्हणाल्या, आम्ही जी 20 च्या नेत्यांशी चर्चा केली आहे. यात विविध आव्हानांवरही चर्चा झाली आहे. इंडोनेशिया कठिण काळातून गेला आहे. जेव्हा आव्हाने खूप असतात तेव्हा सर्व सदस्यांनी मिळून काम करावे लागेल.

दरम्यान, अर्थमंत्री सीतारामन यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालपास यांची भेट घेतली. भारताच्या जी 20 परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत तसेच भारतातील डिजिटाइजेशनबाबतही उभयतांत चर्चा झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com