MBBS In Hindi: देशात पहिल्यांदाच मध्यप्रदेशात एमबीबीएस चे शिक्षण हिंदीतून दिले जाणार आहे. यामुळे देशात क्रांती घडणार आहे, असे मत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. शाह यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाच्या तीन हिंदी पुस्तकांचे प्रकाशन रविवारी भोपाळमध्ये करण्यात आले.
97 डॉक्टरांच्या पथकाने चार महिने काम करून ही तीन पुस्तके तयार केली आहेत. 15 नोव्हेंबरपासून एमबीबीएसच्या नव्या बॅचच्या विद्यार्थ्यांना या हिंदीत अनुवादित केलेल्या पुस्तकांद्वारे शिकवले जाईल.
शाह म्हणाले, हा क्षण देशातील शिक्षण क्षेत्राच्या पुनर्निमाणाचा आहे. हिंदीतून वैद्यकीय शिक्षणाची सुरवात करून शिवराज सिंह यांनी मोदींची इच्छा पुर्ण केली आहे. देशात ८ भाषांमध्ये शिक्षण घेतले जाते. युजीसीची नीट परीक्षा देशातील २२ भाषांमध्ये होते. १० राज्यांमध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम मातृभाषेत शिकवला जात आहे.
शाह म्हणाले, मेडिकल, इंजिनिअरिंगमध्ये जे मातृभाषेचे समर्थक आहेत त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. आपल्याला आता आपल्या भाषेत शिक्षण मिळणार आहे. मध्यप्रदेशच्या निवडणुकीवेळी जाहीरनाम्यातही ही घोषणा केली होती. मोदींच्या नव्या शिक्षण धोरणाला मध्यप्रदेशने सर्वात आधी सत्यात उतरवले आहे. विचार करण्याची प्रक्रिया मातृभाषेत होत असते. संशोधन आपल्या भाषेत झाले तर भारतीय युवकही कुठे मागे पडणार नाहीत. मध्यप्रदेशने वैद्यकीय शिक्षण हिंदीतून देण्याचा संकल्प केला आहे, यामुळे देशात क्रांती घडणार आहे. काही दिवसांनंतर इंजिनिअरिंगचे शिक्षणही हिंदीतून सुरू होईल. अभ्यासक्रमाच्या अनुवादाचे काम सुरू आहे.
आयआयटी, आयआयएममध्ये हिंदीतून शिक्षण : शिवराजसिंह चौहान
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, इंग्रज गेले पण आपल्याला इंग्रजी भाषेचे गुलाम करून गेले. मोदींनी भारतीयांची मानसिकता बदलण्याचे काम केले. याच वर्षी 6 इंजीनियरिंग आणि 6 पॉलिटेक्टनिक कॉलेजमध्येही हिंदीतून शिक्षण दिले जाईल. आयआयटीमध्येही हिंदीतून शिकवले जाईळ. आयआयएममध्येही हिंदीतूनच शिकवले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.