The ED on Wednesday took action against Jet Airways founder Naresh Goyal and seized their assets worth Rs 538 crore. Dainik Gomantak
देश

ED Raid: देशातील बड्या उद्योगपतीवर EDची धाड, जप्त केली 538 कोटींची मालमत्ता

EDने म्हटले आहे की, संबंधीत उद्योगपतीच्या कंपनीविरुद्ध मनी लाँडरिंगच्या चौकशीत प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) 2002 च्या तरतुदींनुसार 538.05 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.

Ashutosh Masgaunde

The ED on Wednesday took action against Jet Airways founder Naresh Goyal and seized their assets worth Rs 538 crore: जेट एअरवेज इंडिया लिमिटेडचे ​​संस्थापक नरेश गोयल यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नरेश गोयल आणि त्यांच्या कुटुंबीयांसह कंपनीवर मोठी कारवाई केली आहे.

ईडीने नुकतेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांच्यावर कारवाई केली आणि त्यांची लंडन, दुबई आणि विविध राज्यांतील ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड विरुद्ध मनी लाँडरिंगच्या चौकशीत प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) 2002 च्या तरतुदींनुसार 538.05 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.

ईडीने सांगितले की, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये विविध कंपन्या आणि व्यक्तींच्या नावे 17 निवासी सदनिका/बंगले आणि व्यावसायिक जागेचा समावेश आहे.

JetAir Pvt Ltd, Jet Enterprises Pvt Ltd, Jet Airways (India) Ltd (JIL) चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल हे लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमध्ये स्थायिक आहेत.

Jet Airways founder Naresh Goyal

कथित फसवणुकीच्या प्रकरणात जेट एअरवेजचे नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि कंपनीचे काही माजी अधिकारी यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या एफआयआरमधून मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर ईडी सातत्याने कारवाई करत आहे.

ईडीने नरेश गोयल यांना 1 सप्टेंबर रोजी अटक केली होती.| Jet Airways founder Naresh Goyal

याआधी 31 ऑक्टोबरला ईडीने नरेश गोयल आणि इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. जे कॅनरा बँकेतील 538 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित आहे.

या प्रकरणी ईडीने नरेश गोयल यांना 1 सप्टेंबर रोजी अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT