300 रुपये पगार ते Jet Airways ची मालकी, नरेश गोयल यांच्या पतनाची इनसाइड स्टोरी

Naresh Goyal Story: काही वर्षांपूर्वीपर्यंत शेकडो कोटींमध्ये खेळणारे नरेश गोयल आज तुरुंगात आहेत. बँक फसवणुकीच्या एका प्रकरणात ईडीने त्यांना काल रात्री अटक केली.
Naresh Goyal
Naresh Goyal Dainik Gomantak

Naresh Goyal Story: काही वर्षांपूर्वीपर्यंत शेकडो कोटींमध्ये खेळणारे नरेश गोयल आज तुरुंगात आहेत. बँक फसवणुकीच्या एका प्रकरणात ईडीने त्यांना काल रात्री अटक केली.

नरेश गोयल यांनी आईकडून कर्ज घेऊन जेट एअरवेज सुरु केली होती. जेट एअरवेजच्या IPO नंतर, फोर्ब्सने नरेश गोयल यांची एकूण संपत्ती $1.9 अब्ज असल्याचा अंदाज वर्तवला होता.

पण त्यांच्या कंपनीच्या पडझडीप्रमाणे त्यांच्या नशीबानेही साथ सोडली. नरेश गोयल यांनी 300 रुपयांच्या नोकरीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली.

चला तर मग जाणून घेऊया त्यांचा जेट एअरवेजचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर सिंहासनावरुन पायउतार होण्याची कहाणी...

1967 मध्ये ट्रॅव्हल एजन्सीमध्ये 300 रुपयांची नोकरी

दरम्यान, डिसेंबर 1949 मध्ये पंजाबमधील (Punjab) संगरुर येथे जन्मलेले नरेश गोयल यांचे वडिल ज्वेलरी व्यावसायिक होते. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला. जेव्हा ते 11 वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटातून गेले होते.

त्यावेळी सरकार आणि बँकेच्या कारवाईमुळे गोयल कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता बुडाली. त्यानंतर ग्रॅज्युएशनपर्यंतचे त्यांचे शिक्षण त्यांच्या मामांनी केले.

ग्रॅज्युएशननंतर 1967 मध्ये त्यांनी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कॅशियर म्हणून काम केले. येथे त्यांना दरमहा 300 रुपये पगार मिळत असे.

Naresh Goyal
FD Interest Rates: 'या' 2 बँकांनी दिलं मोठं गिफ्ट, या योजनेत सुकन्या समृद्धीपेक्षा जास्त मिळतयं व्याज!

अनेक ट्रॅव्हल एजन्सीमध्ये सात वर्षे काम केले

यानंतर, नरेश लेबनीज इंटरनॅशनल एअरलाइन्ससाठी जीएसए ट्रॅव्हल एजन्सीमध्ये रुजू झाले. 1967-1974 दरम्यान, गोयल यांनी अनेक परदेशी एअरलाइन्समध्ये सहभागी होऊन ट्रॅव्हल एजन्सीचे काम शिकले. यादरम्यान त्यांनी परदेश दौरेही केले.

कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे 1969 मध्ये त्यांची इराकी एअरवेजचे पीआर मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली.

1971 मध्ये, गोयल रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्सचे प्रादेशिक व्यवस्थापक बनले आणि 1974 पर्यंत त्याच पदावर काम केले. या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या कामाचा अनुभव घेतला.

ट्रॅव्हल एजन्सी 1974 मध्ये सुरु झाली

यानंतर, त्यांनी 1974 मध्ये आईकडून पैसे उधार घेऊन ट्रॅव्हल एजन्सी सुरु केली. त्यांनी आपल्या एजन्सीचे नाव जेटएअर ठेवले. जेटएअरने एअर फ्रान्स, ऑस्ट्रियन एअरलाइन्स आणि कॅथे पॅसिफिक एअरलाइनच्या विक्री आणि विपणनावर काम केले.

ते 1975 मध्ये फिलिप एअरलाइन्सचे प्रादेशिक व्यवस्थापक झाले आणि त्यांनी भारतातील एअरलाइन्सचे व्यावसायिक कामकाज हाताळले.

1991 मध्ये भारत सरकारने ओपन स्काईज पॉलिसी जाहीर केली तेव्हा 1992 मध्ये त्यांनी एअरलाइन कंपनी सुरु केली. त्यांनी जेट एअर या ट्रॅव्हल एजन्सीचे नाव बदलून जेट एअरवेज केले.

Naresh Goyal
FD Interest Rates: या 5 बँकांनी मोडला विक्रम, FD वर देतायेत सर्वाधिक व्याज

जेट एअरवेजची सुरुवात 1993 मध्ये झाली

जेट एअरवेजने 1993 मध्ये देशात आपले कामकाज सुरू केले. 2004 पर्यंत, जेट एअरवेजने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली.

2007 मध्ये एअर सहारा ताब्यात घेतल्यानंतर, 2010 पर्यंत जेट एअरवेज देशातील सर्वात मोठी विमान कंपनी होती. बरीच वर्षे सर्व काही ठीक चालले पण त्यांच्या कंपनीसाठी अडचणी वाढू लागल्या आणि मार्च 2019 मध्ये त्यांना त्यांच्या पदावरुन पायउतार व्हावे लागले.

2019 मध्ये कंपनीच्या बोर्डाचा राजीनामा

दरम्यान, 2000 च्या दशकात त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. जेट एअरवेजची स्थापना दाऊदने केल्याचेही सांगण्यात आले.

संशयास्पद व्यवहारांशी संबंधित एका प्रकरणात, ईडीने फेमा अंतर्गत त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा नोंदवला होता. यानंतर 2019 मध्ये त्यांनी पत्नी अनिता गोयल यांच्यासह जेट एअरवेजच्या बोर्डाचा राजीनामा दिला. पण त्यांचा त्रास इथेच संपला नाही.

Naresh Goyal
Saving Account Interest Rate: सेव्हिंग अकाउंट असणाऱ्यांना लागली लॉटरी, 'या' बँकेच्या ग्राहकांना आजपासून मिळणार अधिक लाभ!

कोणत्या बाबतीत ते तुरुंगात गेले होते?

जेट एअरवेजनेही काम बंद केले आहे. प्रवर्तक नरेश गोयल यांच्यावर ईडीने आपली पकड घट्ट केली आहे. ईडीने गोयल आणि इतर अनेकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा नोंदवला. दिल्ली ते मुंबईपर्यंत त्यांच्या आठ ठिकाणी छापे टाकून त्यांच्यावरील आपली पकड मजबूत केली.

तपास यंत्रणेने कॅनरा बँकेच्या तक्रारीच्या आधारे नवीन गुन्ह्याची नोंद केली आहे. कॅनरा बँकेवर जेट एअरवेज (इंडिया) साठी 848.86 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे.

त्यापैकी 538.62 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यांना एवढीच माहिती आहे की ते बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणात अडकले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com