Jammu and Kashmir Twitter @Ani
देश

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडिताची हत्या, दहशतवाद्यांनी झाडल्या गोळ्या

ओळख पटल्यानंतरच ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या गोळीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात जात असताना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडलेल्या व्यक्तीची ओळख काश्मीर पंडित अशी झाली आहे. ओळख पटल्यानंतरच ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संजय शर्मा असे या हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते बँकेत काम करायचे अशी माहिती समोर आली आहे.

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संजय शर्मा दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अचन भागातील रहिवासी आहेत. शर्मा 40 वर्षांचे होते. "दहशतवाद्यांनी पुलवामामधील अल्पसंख्याक समुदायातील अचन येथील रहिवासी काशिनाथ शर्मा यांचा मुलगा संजय शर्मा यांच्यावर गोळीबार केला. घटनेच्या वेळी ते बाजारपेठेत जात होते." असे काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटरवर लिहिले आहे.

शर्मा यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. “त्याच्या गावात सशस्त्र दल तैनात करण्यात आले आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT