Goa Monsoon Update Dainik Gomantak
देश

Monsoon Update: दिल्लीत रिमझिम पावसामुळे घसरला पारा

Weather Updates In India: 29 जूनपर्यंत उत्तर भारतीयांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

देशाची राजधानी दिल्लीत रिमझिम पावसामुळे पारा घसरला आहे. यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, देशाच्या उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेनंतर आता मान्सून सुरू झाल्याने तापमानात घट झाली आहे. त्यामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. (Weather Updates In India news)

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, असा अंदाज दर्शवण्यात आली आहे की 23 जून ते 29 जून दरम्यान नैऋत्य मान्सून वायव्य भारत आणि मध्य भारतातील अनेक भाग व्यापू शकतो. IMD कडून गुरुवारी असे सांगण्यात आले की देशाच्या सर्व भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आता संपत आहे. IMD च्या मते, नैऋत्य मान्सून आता मध्य आणि पूर्व भारताकडे सरकत आहे. त्यामुळे पश्चिम विक्षोभाचा परिणाम उत्तर-पश्चिम भागावर होत आहे.

उष्णतेच्या लाटेपासून 29 जूनपर्यंत दिलासा मिळेल

IMD नुसार, 16 जूनपासून उष्णतेची लाट संपली आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या मध्य आणि पूर्व भारताकडे वाटचाल झाल्यामुळे, आता उत्तर-पश्चिम आणि मध्य भागांमध्ये कमाल तापमानात 5 ते 10 अंश सेल्सिअसची घट झाली आहे. त्याच बरोबर IMD च्या अंदाजानुसार 29 जून पर्यंत देशाच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.

15 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम होती

भारतीय हवामान विभागनुसार (IMD), 2 जूनपासून वायव्य भारत आणि 10 जूनपासून मध्य भारत उष्ण आणि कोरड्या पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे उष्णतेच्या लाटेत होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. IMD नुसार 15 जूनपर्यंत दिल्ली, दक्षिण हरियाणा, दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट दिसून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT