lalu prasad yadav dainik gomantak
देश

केंद्र सरकारने वडिलांना सोडावे : तेज प्रताप

'मुख्यमंत्री नितीश कुमार यांना तुरुंगात पाठवा'

दैनिक गोमन्तक

पटना : लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रांची येथील रिम्समधून दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यांनी वडिलांची प्रकृती आणि वयाचे कारण देत त्यांची सुटका करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असून त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही निशाणा साधला आहे. मेडिकल बोर्डाच्या सल्ल्यानुसार यादव यांना मंगळवारी रांची येथील RIMS येथून दिल्लीला पाठवण्यात आले. दिल्ली एम्स इमर्जन्सीमध्ये ठेवल्यानंतर मंगळवारी रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर तिथल्या डॉक्टरांनी रांचीच्या रिम्समध्येच उपचाराबाबत सांगितले होते. (Tej Pratap said Central government should release father)

यावेळी तेज यांनी, आता आमच्या वडिलांना सोडावे, अशी आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. ज्यांनी हे काम (चारा घोटाळा) केले ते बिनधास्त फिरत आहेत. मात्र माझ्या वडिलांनी चारा घोटाळा (Fodder Scam) उघड केला, त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचे ही तेज म्हणाले.

तसेच तेज म्हणाले की, वयाच्या २१व्या वर्षापासून ते तुरुंगात जात आहेत. ज्यांनी हे काम केले तेच लोक आज घरात बसले आहेत. यावेळी मुख्यमंत्री (CM Nitish Kumar) नितीश कुमार यांचा खरपूस समाचार घेत तेज यांनी, त्यांच्यावर गंभीर हत्येचा आरोप असून त्यांनाही जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी आमची केंद्र सरकारकडे मागणी असल्याचे म्हटले.

दरम्यान, रांचीला येत असताना विमानतळावर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना पुन्हा एम्समध्ये (AIIMS) आणण्यात आले. आपत्कालीन स्थितीत तपास केल्यानंतर लालूंना नेफ्रोलॉजीच्या सी-6 वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. लालूंवर नेफ्रोलॉजीचे डॉक्टर भौमिक यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

लालूंच्या प्रकृतीबाबत त्यांचे धाकटे पुत्र आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सांगितले की, त्यांना किडनी (Kidney) आणि हृदयाचा (Heart) त्रास आहे. रांचीमध्ये त्यांची क्रिएटिनिन पातळी ४.५ होती. दिल्लीला (Delhi) पोहोचल्यावर त्याची तपासणी केली असता ती वाढून ५.१ झाली. तर पुन्हा तपासणी केली असता त्याची पातळी ५.९ होती. तपासणी अहवालात संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत असल्याचेही तेजस्वी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT