Team India Title Sponsor Dainik Gomantak
देश

Team India Title Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवरून उतरलं 'ड्रीम', आता कोण होणार नवा प्रायोजक? 'या' मोठ्या कंपनीचं नाव चर्चेत

Team India: फॅण्टसी स्पोर्ट्स कंपनी ड्रीम११ ही आता भारतीय क्रिकेट संघाची प्रमुख प्रायोजक असणार नाही. त्यामुळे बीसीसीआयने लगेचच नवीन प्रायोजक शोधण्याची प्रक्रिया सुरू केली

Sameer Amunekar

नवी दिल्ली: फॅण्टसी स्पोर्ट्स कंपनी ड्रीम११ ही आता भारतीय क्रिकेट संघाची प्रमुख प्रायोजक असणार नाही. त्यामुळे बीसीसीआयने लगेचच नवीन प्रायोजक शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र पुढील महिन्यातील आशिया करंडकापूर्वी हा निर्णय अंतिम होण्याची शक्यता नाही. परिणामी भारतीय संघ कोणत्याही प्रायोजकाविना या स्पर्धेत उतरेल.

ड्रीम११ यांच्याशी असललेली बीसीसीआयचा करार संपुष्टात आलेला आहे आणि आम्ही नवा प्रायोजक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सोमवारी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या नियमानुसार आमची भूमिका स्पष्ट आहे.

सैकिया पुढे म्हणाले, “सरकारच्या नियमांनुसार बीसीसीआय ड्रीम११ किंवा अशा कुठल्याही गेमिंग कंपनीसोबत प्रायोजकत्वाचे नाते ठेवू शकत नाही. सध्याच्या निर्बंधांमुळे आम्हाला ड्रीम११सोबत पुढे जाता येत नाही.

या कायद्यानुसार, ऑनलाइन पैसे लावून खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे, त्याचे जाहिरात करणे किंवा अशा सेवा पुरवणे पूर्णपणे बंदिस्त आहे. उल्लंघन केल्यास एका कोटी रुपयांपर्यंत दंड किंवा तीन वर्षांची कैद होऊ शकते.

बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “ही ड्रीम११ची चूक नाही. हा सरकारी नियम आहे आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना कोणताही दंड केला जाणार नाही, मात्र अल्पकालीन स्वरूपात बीसीसीआयच्या नफ्यावर याचा परिणाम होईल.” त्यांनी पुढे नमूद केले की आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना फक्त १५ दिवसांवर आला आहे. त्यामुळे नवीन प्रायोजक मिळवणे कठीण आहे. कारण निविदा मागवणे, तपासणी करणे आणि प्रायोजक निश्चित करणे या प्रक्रियेला वेळ लागतो.

आयपीएलवरही परिणाम

दरम्यान, माय ११सर्कल कंपनीलाही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये फॅण्टसी स्पोर्ट्स पार्टनर म्हणून अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यांनी पाच वर्षांसाठी ६२५ कोटी रुपयांचा करार केला आहे, मात्र बीसीसीआयला आयपीएल सुरू होण्यासाठी पुरेसा वेळ असल्यामुळे, आवश्यक असल्यास पर्याय शोधण्याची संधी आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,  टोयोटा ही जपानी कार कंपनी भारतीय संघाची टायटल स्पॉन्सर बनण्यास इच्छुक आहे. टोयोटासारख्या मोठ्या कंपनीने रस दाखवल्यानंतर बीसीसीआयकडून विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे टोयोटा हे नाव भारतीय संघाच्या जर्सीवर पाहायला मिळणार का हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dead Whale Fish: तळपण समुद्रकिनाऱ्यावर आढळला 30 फूट लांब कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा

India America Relations: ट्रम्प यांनी 4 वेळा फोन केला, पण मोदींनी घेतला नाही? जर्मन मासिकाचा मोठा दावा

Test Record: विराट की पुजारा? 103 कसोटीनंतर कुणाचा रेकॉर्ड आहे खास; वाचून वाटेल आश्चर्य

Barge Sank: समुद्रात असलेल्या जहाजाच्या अवशेषांनी घात केला; मुरगावात लोखंडी प्लेट्सने भरलेल्या बार्जला जलसमाधी, 8 खलाशी बचावले

Shubman Gill Video: 'मी पण पाकिस्तानी फलंदाज नाही...', शुभमन गिलचं सडेतोड उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT