Shubman Gill Video: 'मी पण पाकिस्तानी फलंदाज नाही...', शुभमन गिलचं सडेतोड उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Shubman Gill Old Video Viral: भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिलचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Shubman Gill Old Video Viral
Shubman Gill VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Shubman Gill Old Video Viral: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ एक खेळ नसतो, तर तो दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी एक मोठी भावनिक लढाई असते. या सामन्याच्या आधी दोन्ही बाजूंचे खेळाडू अनेकदा एकमेकांना शाब्दिक आव्हान देताना दिसतात. आता, आशिया कपच्या आधी पाकिस्तानचा गोलंदाज हारिस राऊफने भारताविरुद्ध दोन्ही सामने जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिलचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीला दिलेल्या सडेतोड उत्तराची आठवण करुन दिली आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

नेमकं काय घडलं होतं?

शुभमन गिलने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, शाहीन आफ्रिदीने त्याला बाउन्सर टाकल्यानंतर स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने शाहीनला असे काही उत्तर दिले की, त्याची बोलतीच बंद झाली.

गिलने पुढे सांगितले की, "शाहीन आफ्रिदी गोलंदाजी करत होता. मी पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलो. त्याने मला एक बाउन्सर टाकला, ज्यावर मी पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या हँडलला लागला आणि मिड-ऑनच्या दिशेने गेला."

फटका चुकला असल्याचे पाहून शाहीन आफ्रिदीने शुभमन गिलकडे येत त्याला डिवचले. शाहीन म्हणाला, "हे बांगलादेशचे गोलंदाज नाहीत." शाहीनने बांगलादेशच्या गोलंदाजांवर टीका करत गिलची मस्करी करण्याचा प्रयत्न केला, पण गिल शांत राहिला.

गिलचे सडेतोड प्रत्युत्तर

शाहीनने डिवचल्यानंतरही शुभमन गिलने लगेच शाब्दिक प्रत्युत्तर दिले नाही. त्याऐवजी, त्याने आपल्या दमदार खेळीने उत्तर देण्याचा निर्णय घेतला. पुढच्याच चेंडूवर त्याने शाहीनच्याच गोलंदाजीवर फ्लिक शॉट मारत एक सुंदर चौकार लगावला. यानंतरही शाहीन शांत बसला नाही आणि त्याने पुन्हा एकदा गिलला बाउन्सर टाकला. पण या वेळीही गिलने त्याला जोरदार पुल शॉट मारत दुसरा चौकार ठोकला.

सलग दोन चौकार बसल्यामुळे शाहीन चवताळला आणि शुभमनकडे रागाने पाहून परत जात होता. त्याचवेळी शांत असलेल्या गिलने त्याला आपल्या खास अंदाजात उत्तर दिले. गिल म्हणाला, "मी सुद्धा पाकिस्तानचा (Pakistan) फलंदाज नाही." गिलच्या या उत्तराने शाहीनला काहीच बोलता आले नाही आणि तो शांतपणे निघून गेला. गिलचा हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानविरुद्ध शुभमन गिलची कामगिरी

आतापर्यंत शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध फारसे सामने खेळलेला नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 32.50 च्या सरासरीने 130 धावा केल्या आहेत. यात त्याचे एक अर्धशतक असून, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 58 आहे. आशिया कपमध्ये गिलसमोर पुन्हा एकदा पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे.

विशेष म्हणजे, हा शुभमन गिलचा पाकिस्तानविरुद्धचा पहिलाच टी-20 सामना असेल. भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून तो टी-20 फॉरमॅटमध्ये पाकिस्तानसमोर कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. क्रिकेटमधील अशा घटना खेळाडूंच्या मानसिकतेची आणि आत्मविश्वासाची झलक दाखवतात. शुभमन गिलच्या या व्हायरल व्हिडिओमुळे भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com