Tata Group Rafale collaboration Dainik Gomantak
देश

Rafale Jet Parts: टाटा समूह बनविणार ‘राफेल’चे सुटे भाग! ‘डसॉल्ट एव्हिएशन’सोबत करार; अन्‍य देशांमध्‍येही करणार विक्री

Rafale parts made in India: जगप्रसिद्ध ‘राफेल’ या लढाऊ विमानाच्या काही सुट्या भागांची निर्मिती टाटा उद्योगसमूह करणार असून भारतासह अन्य देशांमध्ये त्यांची विक्री करण्यात येईल.

Sameer Panditrao

नवी दिल्ली: जगप्रसिद्ध ‘राफेल’ या लढाऊ विमानाच्या काही सुट्या भागांची निर्मिती टाटा उद्योगसमूह करणार असून भारतासह अन्य देशांमध्ये त्यांची विक्री करण्यात येईल. यासाठी टाटा समूहाने ‘डसॉल्ट एव्हिएशन’ या फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी केली आहे. हैदराबादेतील प्रकल्पामध्ये या सुट्या भागांची निर्मिती करण्यात येईल.

‘डसॉल्ट एव्हिएशन’ आणि ‘टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड’ (टीएएसएल) यांच्यात चार निर्मिती हस्तांतर करार झाले आहेत. भारतात प्रामुख्याने विमानाचे सांगाडे तयार केले जातील. हवाई उत्पादन क्षेत्रातील भारताची क्षमता वाढविण्याबरोबरच वैश्विक पुरवठा साखळी अधिक भक्कम करण्याच्या उद्देशानेच ही भागीदारी करण्यात आली आहे.

हैदराबादेतील या प्रकल्पामुळे भारतामध्ये लक्षणीय गुंतवणूक होणार असून उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून देश नावारूपास येईल असे दोन्ही समूहांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. या प्रकल्पातील सांगाड्यांची निर्मिती करणारा आणि अंतर्गत सुट्या भागांची जुळवाजुळव करणारा विभाग २०२८ पर्यंत कार्यान्वित होईल.

या प्रकल्पातून दरमहा दोन सांगाड्यांची निर्मिती होईल. दरम्यान राफेल विमानांची देशाबाहेर उत्पादन करण्याची फ्रान्स सरकारची ही पहिली वेळ आहे. ‘डसॉल्ट एव्हिएशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि अध्यक्ष एरिक ट्रॅपियर म्हणाले की देशाबाहेर राफेलच्या महत्त्वपूर्ण भागांचे उत्पादन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतामधील पुरवठा साखळी भक्कम करण्याच्या अनुषंगाने हे पाऊल निर्णायक ठरेल.

वैशिष्ट्यपूर्ण एअरोडायनॅमिक आकार

राफेल विमानाची लांबी ही १५.२७ मीटर इतकी आहे तर यातील मुख्य सांगाड्याचे वजन सुमारे २ ते ३ हजार किलोग्रॅम इतके असते. विमानाच्या एकूण वजनाच्या तुलनेत हे प्रमाण २० ते ३० टक्के इतके आहे. विमानाने वेगाने उड्डाण करावे तसेच त्याचे हवेसोबतचे घर्षण कमी व्हावे यासाठी त्यांना एअरोडायनॅमिक आकार दिला जातो. राफेल विमानाच्या पुढे छोटे कॅनॉर्ड विंग्ज आणि मागे त्रिकोणी डेल्टा आकाराचे पंख जोडले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ..काय हा योगायोग! गावडेंचे आसन तवडकरांना, विधानसभेत बैठकव्‍यवस्‍थेत बदल; गावकर 19 वरून 1ल्या क्रमांकावर

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे भोजन

Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

Ganesh Gaonkar: ‘एकावेळी एकानेच बोला’! नवनियुक्त सभापतींचे पहिल्‍याच दिवशी शिस्‍तीचे धडे; आमदारांना दिली तंबी

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT