Manohar Parrikar: राफेल अन् एस 400 सिस्टिमने पाकड्यांची ठेचली नांगी!! भारताचं 'सुरक्षा कवच' मजबूत करणाऱ्या पर्रीकरांची येतेय आठवण

Operation Sindoor Air Strike: भारताच्या अत्याधुनिक युद्धसामग्रीपुढे पाकिस्तानचे भ्याड हल्ले निष्फळ ठरले. भारत-पाकिस्तानात निर्माण झालेल्या युद्धजन्य परस्थितीत देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
Manohar Parrikar Defense Deals
Manohar ParrikarDainik Gomantak
Published on
Updated on

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना ठार मारणाऱ्यांना भारत अजिबात सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. हल्ल्यानंतर 15 दिवसांनी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकड्यांना अद्दल घडवली. पाकिस्तानात 100 किमी आत घुसून भारताने दाणादाण उडवली.

भारताने (India) पाकिस्तानातील विविध शहरांतील दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतातील सीमावर्ती शहरांवर ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली. मात्र पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत भारताने सर्व हल्ले हाणून पाडले. भारताच्या अत्याधुनिक युद्धसामग्रीपुढे पाकिस्तानचे भ्याड हल्ले निष्फळ ठरले. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानात निर्माण झालेल्या युद्धजन्य परस्थितीत देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण येत आहे.

Manohar Parrikar Defense Deals
India Pakistan War: पाकिस्तानच्या ड्रोन, क्षेपणास्त्रांचा खात्मा! भारताकडून इस्लामाबाद, लाहोर, बहावलपूर येथे हल्ले

भारताच्या हवाई यंत्रणेने पाकड्यांची खुमखुमी जिरवली. ऑपरेशन सिंदूरसाठी भारताकडून राफेल आणि एस-400 म्हणजेच सुदर्शन या एअर डिफेन्स सिस्टिमचा यशस्वी वापर करण्यात आला. पण दुसरीकडे, सोशल मीडियावर देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची आठवण यूजर्स काढत आहेत. राफेल आणि एस-400 ही सिस्टिम भारतात आणण्यात पर्रीकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

राफेल खरेदीची प्रक्रिया

काँग्रेस सरकारच्या काळात 2007 मध्ये राफेल विमानांची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यानंतर तब्बल 5 वर्षांनी म्हणजेच 2012 मध्ये या राफेल विमानांच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाला होता. पण तुम्हाला माहिती आहे का की, ही प्रक्रिया या करारातील अटींमुळे लांबली होती. 2014 मध्ये मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यानंतर 2015 मध्ये 2007 मधील हा करार रद्द झाला होता.

त्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते. 2016 मध्ये भारत-फ्रान्स यांच्यात राफेल विमानांबाबत करार झाला होता. भारताकडून या करारावर त्यावेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वाक्षरी केली होती. त्यानंतर तब्बल 4 वर्षांनी म्हणजेच 2020 मध्ये ही विमाने भारतात दाखल झाली होती.

Manohar Parrikar Defense Deals
India Pakistan War: भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान बेजार! कर्जासाठी भटकंती सुरू, मित्र राष्ट्रांकडे मागितली मदत

पर्रीकरांची शिष्टाई

राफेल विमानांच्या खरेदीचा मार्ग जेवढा सोपा वाटत होता तेवढा सोपा नव्हता. करारातील अटी, भारत-फ्रान्सच्या सरकारच्या मागण्या अशा अनेक अडचणी करारादरम्यान आल्या. पण सगळ्यामध्ये पर्रीकरांची शिष्टाई कामी आली. त्यांनी हा करार यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. याच राफेल विमानांनी पाकिस्तानला अद्दल घडवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. राफेल विमानांपाठोपाठ पर्रीकरांनी एस-400 या एअर डिफेन्स सिस्टीमही भारतात आणून आपली ताकद दाखवून दिली होती.

Manohar Parrikar Defense Deals
India Attack Pakistan: भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; इस्लामाबाद, कराची, बहावलपूरमध्ये हवाई हल्ला

एस-400 सिस्टिम खरेदीत पर्रीकरांची भूमिका

भारताचा पारंपारिक मित्र रशियाकडून एस-400 ही सिस्टिम भारताने ऑक्टोबर 2018 खरेदी केली होती. या सिस्टिमने आता पाकिस्तानचे भ्याड हल्ले उलथवून लावले. ही सिस्टिम खरेदी करण्यातही पर्रीकरांची भूमिका होती. त्यांनी भारताकडून करारवर स्वाक्षरी केली होती. त्यावेळी पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री होते. या सिस्टिम खरेदीच्या प्रक्रियेत पर्रीकरांमुळेच भारताचे सुमारे 50 हजार कोटी वाचल्याचे सांगितले जाते. आता पाकिस्तानविरोधातील धडक लष्करी कारवाईत राफेल आणि एस-400 सिस्टिमने आपली ताकद दाखवून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com