PM Modi France Visit: नौदलाला मिळणार २६ राफेल-एम लढाऊ विमाने, पीएम मोदींच्या फ्रान्स दौऱ्यावर होऊ शकते शिक्कामोर्तब

Rafael: अमेरिकन फायटर हॉर्नेटपेक्षा हे विमान चांगले आणि स्वस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. ही विमाने आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात करता येतील.
Rafael
RafaelDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi France Visit: भारत चीन आणि पाकिस्तानच्या विरोधात भारत स्व:ताला सतत बळकट करत आहे. गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे.

दरम्यान, भारतीय नौदलाच्या ताफ्यातही अनेक पटींनी वाढ होणार आहे. आयएनएस विक्रांतसाठी फ्रान्सकडून २६ राफेल (समुद्री लढाऊ जेट) विमानांचा करार होऊ शकतो, ज्यावर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी होऊ शकते.

पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत या अब्जावधींच्या करारावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

पीएम मोदींच्या दौऱ्यात तीन पाणबुड्या बांधण्याबाबत चर्चा होऊ शकते. मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत त्यांना भारतात आणण्याबाबत चर्चा होऊ शकते. म्हणजेच ते भारतातच तयार होऊ शकतात.

मात्र, अद्याप यासंदर्भात शासनाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. येत्या काही दिवसांत यावर चित्र स्पष्ट होऊ शकेल.

Rafael
West Bengal Panchayat Election 2023: राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' दिवशी होणार पुन्हा मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 14 जुलै या दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. या काळात होणाऱ्या संरक्षण सौद्यांवर दोन्ही देशांकडून सध्या मौन पाळण्यात आले आहे.

भारत आणि फ्रान्स संरक्षण सौद्यांसाठी रोडमॅप तयार करू शकतात, असे मानले जात असले तरी. फ्रेंच कंपन्यांच्या मदतीने भारतात इंजिन आणि इतर गोष्टी तयार करण्याचा भारत प्रयत्न करणार आहे.

यामध्ये विशेषत: भारतीय नौदलासाठी अनेक प्रकारची नवीन तंत्रज्ञानाची शस्त्रे खरेदी करता येतील. सागरी सीमेवर चीनकडूनही भारताला धोका निर्माण झाला आहे, अशा परिस्थितीत फ्रान्ससोबतचा हा करार अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

Rafael
West Bengal Panchayat Election 2023: राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' दिवशी होणार पुन्हा मतदान

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली आहे. 13 जुलै रोजी होणाऱ्या या बैठकीत भारतीय नौदलासाठी 26 राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. त्यामुळे सर्वांच्या नजरा डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिलच्या (डीएसी) या बैठकीकडे लागल्या आहेत.

फ्रान्सची राफेल-एम लढाऊ विमाने समुद्रात पाळत ठेवण्यासाठी आणि लढण्यासाठी अत्यंत अचूक मानली गेली आहेत.

अमेरिकन फायटर हॉर्नेटपेक्षा हे विमान चांगले आणि स्वस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. ही विमाने आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com