Viral Video: अंत्यविधीच्या ठिकाणी 'ऑर्केस्ट्रा'! एका बाजूला चिता जळतेय, दुसऱ्या बाजूला गाण्यांवर डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Viral Funeral Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज काहीतरी नवीन आणि अविश्वसनीय गोष्टी व्हायरल होत असतात.
Viral Funeral Video
Viral Funeral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Funeral Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज काहीतरी नवीन आणि अविश्वसनीय गोष्टी व्हायरल होत असतात. अनेकदा 'जुगाड', डान्स, स्टंट किंवा भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होतात. पण सध्या एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहिल्यानंतर लोकांना हसावे की आश्चर्यचकित व्हावे, हे समजत नाहीये. या व्हिडिओमध्ये एकाच ठिकाणी दोन पूर्णपणे विरुद्ध गोष्टी घडताना दिसत आहेत. एका बाजूला अंत्यसंस्कार सुरु आहे, तर दुसऱ्या बाजूला ऑर्केस्ट्रावर गाणी आणि डान्सचा कार्यक्रम सुरु आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Viral Funeral Video
पंतप्रधानांचे चरणस्पर्श करताच कॅमेऱ्यांनी टिपला क्षण! ऐश्वर्याने घेतले मोदींचे आशीर्वाद; श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातील Video Viral

नेमके काय दिसले व्हिडिओमध्ये?

हा व्हायरल व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य फारच विलक्षण आहे. व्हिडिओच्या एका भागात धुराचे लोट आणि चिता जळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचवेळी, चिता जळत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर दुसऱ्या बाजूला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ऑर्केस्ट्राचा सेट लावलेला दिसत आहे. ऑर्केस्ट्राच्या स्टेजवर एक मुलगी गाण्याच्या तालावर नृत्य करत आहे आणि तिच्यासमोर काही लोक उभे राहून हा कार्यक्रम पाहत आहेत. एका बाजूला शोकाकुल वातावरण आणि दुसऱ्या बाजूला उत्साहाचे संगीत आणि नृत्य पाहून यूजर्संना हा प्रकार पूर्णपणे अजब वाटत आहे.

हा प्रकार का घडला असावा?

हा व्हिडिओ (Video) ज्याने शूट केला आहे, त्याने या घटनेचा दोन्ही बाजूचा भाग एकाच फ्रेममध्ये कैद केला आहे. सामान्यतः, एखाद्या व्यक्तीचे आयुष्यमान पूर्ण झाले असेल, तर काही ठिकाणी त्या व्यक्तीला 'आनंदाने निरोप' देण्याची प्रथा असते. मात्र, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी असा थेट ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पहिल्यांदाच पाहिला जात असल्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral Funeral Video
Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

व्हिडिओला यूजर्सच्या प्रतिक्रिया

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ 'sanjay_rawat_48' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला आणि लाईक केला. व्हिडिओवर यूजर्संनी खूप मजेशीर आणि अतरंगी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • एका युजरने लिहिले: "ज्या व्यक्तीचा अंत्यविधी सुरु आहे, त्याची ही शेवटची इच्छा असावी, जी मित्र पूर्ण करत आहेत."

  • दुसरा युजर थट्टा करत म्हणाला: "पक्का भाई ऑर्केस्ट्रा लवर असेल!"

  • तिसऱ्या युजरची प्रतिक्रिया होती: "कुठे असतात हे लोक? कुठून येतात?"

  • चौथा युजर गमतीत म्हणाला: "संपूर्ण भूत समाजात आनंदाची लाट!"

या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर (Social Media) 'कधी काय बघायला मिळेल सांगता येत नाही,' अशी चर्चा रंगली आहे. अंत्यविधी आणि ऑर्केस्ट्राचा हा विचित्र संगम सध्या नेटकऱ्यांचे मनोरंजन करत आहे, पण त्याचबरोबर अनेकांना हा प्रकार अनाकलनीयही वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com