Tamil Nadu festival ANI
देश

तामिळनाडूत रथोत्सवादरम्यान मोठा अपघात! विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

आज सकाळी तंजावरमधील एका मंदिरात 94 वा उच्च गुरुपूजा उत्सव (chariot festival) साजरा केला जात होता

दैनिक गोमन्तक

Tamilnadu Accident: तामिळनाडूतील एका मंदिरात सुरू असलेल्या उत्सवादरम्यान हायव्होल्टेज वायरचा विजेचा धक्का लागून दोन मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला तर 15जण जखमी झाले. अपघातानंतर प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी तंजावरमधील एका मंदिरात 94 वा उच्च गुरुपूजा उत्सव (chariot festival) साजरा केला जात होता, ज्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी मंगळवारी रात्रीपासूनच आसपासच्या भागातून भाविक येत होते.

मध्येच ही मोठी दुर्घटना घडल्याने प्रचंड गर्दी झाली होती

बुधवारी सकाळी पारंपरिक रथयात्रा शहरातील रस्त्यांवर काढण्यात आली. देवाचा रथ ओढण्यासाठी शेकडो भाविकांमध्ये स्पर्धा सुरू असताना अचानक रथ विजेच्या हाय टेंशन वायरच्या कचाट्यात आला, त्यामुळे संपूर्ण रथात विद्युत प्रवाह गेला. यामुळे 2 मुलांसह 10 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 लोक जखमी झाले आहेत.

क्षेत्राचे आयजी व्ही बालकृष्णन यांनी सांगितले की, या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. मिरवणुकीदरम्यान रथ उघड्या विद्युत तारेशी संपर्कात आला, त्यानंतर हा अपघात झाला. तंजावर मंदिरात 94 वा उत्सवाचा कार्यक्रम पार पडला. या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात पोहोचले होते. यादरम्यान रस्त्यावर पारंपारिक पद्धतीने रथयात्रा काढण्यात आली आणि यावेळी हा अपघात झाला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT