Tamil Nadu Cuddalore Train Accident X Handle
देश

Tamil Nadu Cuddalore Train Accident: स्कूल बसला ट्रेनची धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, बस चालकसह काही विद्यार्थी जखमी

Tamil Nadu Cuddalore Train Accident: व्हॅन चालकासह इतर काही जण जखमी झाले आहेत आणि त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pramod Yadav

तामिळनाडू: कुड्डालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूल बसला विल्लुपुरम-मयिलादुथुराई पॅसेंजर ट्रेनने जोराची धडक दिली. यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, बस चालकासह काही विद्यार्थी जखमी झाले आहे. मंगळवारी (०८ जुलै) सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली.

चारुमती (१६), सेझियान (१५) आणि निमलेश (१२) अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावे आहेत. तर व्हॅन चालकासह इतर काही जण जखमी झाले आहेत आणि त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सेम्मनकुप्पमजवळ हा अपघात झाला बस रेल्वे ट्रॅक ओलांडत होती यावेळी भरधाव आलेल्या ट्रेनने बसला जोराची धडक दिली. धडकेनंतर बस ५० मीटरपर्यंत लांब ओढली गेली आणि तिचे तुकडे तुकडे झाले.

या अपघाताबद्दल रेल्वेने माहिती देताना, गेटकीपर फाटक बंद करण्यासाठी पुढे येत असताना व्हॅन चालकाने जबरदस्तीने ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला. दक्षिण रेल्वेने या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

रेल्वेने याप्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. कुड्डालोर आणि अलप्पक्कम दरम्यान रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १७० (एक नॉन-इंटरलॉक गेट) च्या गेटकीपरला निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आले आहे. गेटकीपरला सेवेतून काढून टाकण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्याच वेळी, रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Salcete No Development Zone: सासष्टीतील 1.02 कोटी चौमी जमीन 'ना विकास क्षेत्र' करण्याचा प्रस्ताव! 5 गावांचा समावेश, ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

SCROLL FOR NEXT