गोवा मे मेरी भाभी है! घरात न सांगता उत्तर प्रदेश येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीला वैभववाडी पोलिसांनी घेतले ताब्यात

Sindhudurg News: बस चालकाला मुलीवर संशय आल्याने त्याने करुळ तपासणी नाक्यावर याबाबत पोलिसांना माहिती दिली.
Sindhudurg News
Private Bus
Published on
Updated on

वैभववाडी: घरातल्यांना न सागंता उत्तर प्रदेश येथून गोव्याकडे येणाऱ्या अल्पवयीन मुलीला वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. इंदोर येथून आरामबसने ती गोव्याकडे येत असताना करुळ तपासणी नाक्यावर तिला ताब्यात घेण्यात आले. गोव्यात माझी भाभी राहते असे तिने सांगितले दरम्यान, चौकशीअंती तिचे कोणी नातेवाईक गोव्यात नसल्याचे आढळून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना बहादुर देवी (१४, रा. बलरामपूर, उत्तरप्रदेश) इंदोर येथून एका आरामबसद्वारे प्रवास करत गोव्याकडे येत होती. बस चालकाला मुलीवर संशय आल्याने त्याने करुळ तपासणी नाक्यावर याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता तिने गोव्यात तिची भाभी असल्याचे सांगितले.

Sindhudurg News
Fatorda: फातोर्ड्यात ट्रॅफिक पोलीस Action Mode वर! 173 जणांवर कारवाई; विनाहेल्मेट 99 जणांना दंड

पोलिसांनी मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे चौकशी केली असता, तिचे कोणीही नातेवाईक गोव्यात नसल्याचे आढळून आले. यानंतर मुलीच्या घरच्यांना संपर्क करुन मुलीची माहिती देण्यात आली. घरच्यांनी मुलगी घरातून न सांगता बाहेर पडली असून, आम्ही तिला घेण्यासाठी येत असल्याचे सांगितले. सध्या अल्पवयीन मुलीला सावंतवाडी येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com