Tamil Nadu BJP Leader Annamalai
Tamil Nadu BJP Leader Annamalai   Twitter/ @ANI
देश

Tamil Nadu Politics: भाजपने जारी केली ‘DMK Files’, CM स्टालिन यांच्यासह पक्षातील नेत्यांवर केले गंभीर आरोप

Manish Jadhav

Tamil Nadu Politics: तामिळनाडू भाजपने शुक्रवारी 'डीएमके फाइल्स' जारी केली. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे कुटुंबीय आणि बड्या मंत्र्यांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आला. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि द्रमुकच्या प्रमुख नेत्यांवर भाजपने केलेला हा ताजा हल्ला आहे.

दरम्यान, तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी गुरुवारी 14 एप्रिलला 'डीएमके फाइल्स' जारी करण्याची घोषणा केली होती. अन्नामलाई यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते की, ते 14 एप्रिल रोजी तामिळ नववर्षाच्या दिवशी द्रमुकच्या मंत्र्यांशी संबंधित 'भ्रष्टाचारा'संबंधी कागदपत्रे जाहीर करतील.

दुसरीकडे, भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी 'द्रमुकच्या फाइल्स' जारी केल्यानंतर सांगितले की, 'केवळ द्रमुकच्या घोटाळ्यांनाच नाही तर सर्व पक्षांनी केलेल्या घोटाळ्यांना आम्ही विरोध करतो. मी याबाबत सर्व काही तामिळनाडूच्या (Tamil Nadu) जनतेला सांगेन.' आमचा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, केवळ कोणा एका पक्षाविरुद्ध नाही, असेही ते म्हणाले.

'माय लँड, माय पीपल' या नावाने यात्रा सुरु करणार

द्रमुकचे हे सर्व घोटाळे लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही 'माय लँड, माय पीपल' या नावाने यात्रा सुरु करत आहोत, असे तामिळनाडू भाजपचे प्रमुख म्हणाले. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ही यात्रा सुरु होईल. तुम्ही सर्वांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असेही ते पुढे म्हणाले.

अन्नामलाई म्हणाले - मालिका चालूच राहील

के अन्नामलाई यांनी पुढे दावा केला की, द्रमुकच्या फायलींचा फक्त भाग 1 आज जारी करण्यात आला आहे. पुढील वर्षभर ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. आम्ही फक्त थेट मालमत्ता, कंपनीतील त्यांची हिस्सेदारी आणि त्यांच्या मालकीच्या मालमत्तेचा खुलासा केला आहे. सर्वात चिंताजनक प्रश्न हा आहे की, DMK जगातील सर्वात मोठ्या मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) व्यवसायाचा एक भाग बनत आहे.

तसेच, के अन्नामलाई यांनी शुक्रवारी 'डीएमके फाइल्स'च्या प्रकाशन दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांच्यासह दिवंगत DMK प्रमुख एम करुणानिधी, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा फोटो असलेला 10 सेकंदाचा व्हिडिओ देखील दाखवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT