B R Ambedkar: संविधान निर्माते बी.आर.आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. यामध्ये आंबेडकरांना भगव्या कपड्यात कपाळावर टिळा दाखवण्यात आला आहे. हे पोस्टर तामिळनाडूच्या कुंभकोणममध्ये हिंदू मक्कल काचीने लावले आहे. हिंदू मक्कल काचीचे संस्थापक अर्जुन संपत म्हणाले की, 'आंबेडकर हे राष्ट्रीय नेते होते. जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे करण्यात आले आहे.'
दरम्यान, विदुथलाई चिरुथाईगल काचीचे नेते आणि खासदार टोलकप्पियन थिरुमावलावन यांनी हे पोस्टर ट्विट करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पोस्टर आंबेडकरांना बदनाम करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. थिरुमावलावन म्हणाले की, 'आंबेडकराचे भगवेकरण झाले आहे, ज्यांनी विष्णू किंवा ब्रह्मदेवाची पूजा करण्यास नकार दिला होता. भगव्या शर्टात आणि कपाळावर पवित्र विभूती लावून आंबेडकरांचे चित्रण करणाऱ्या अशा धर्मांधांना ताबडतोब अटक करावी.'
आंबेडकर भगवे प्रेमी होते: अर्जुन संपत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदू मक्कल काची नेते अर्जुन संपत म्हणाले की, 'जागरुकता निर्माण करण्यासाठी आंबेडकरांचे भगवेकरण करण्यात आले.' ते पुढे म्हणाले की, 'थिरुमावलावन यांचे स्वतःचे मत आहे, पण सत्य हे आहे की आंबेडकर हे भगवाप्रेमी होते. भगव्याचे प्रतीक असलेल्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला होता. आंबेडकरांना 'पेरियाराइज' करण्याचा प्रयत्न करणाऱ्या थिरुमावलावांविरुद्ध जागृती करण्यासाठी आम्ही आंबेडकरांचे भगवेकरण केले आहे.'
महापरिनिर्वाण दिनी देश आंबेडकरांचे स्मरण करतो
आंबेडकरांची पुण्यतिथी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी साजरी केली जाते. तो महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी नवी दिल्ली (New Delhi) येथे निधन झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी संविधानाचे शिल्पकार आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली. त्यांनी ट्विट करत म्हटले की, 'महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतो आणि त्यांनी देशासाठी केलेल्या अनुकरणीय सेवेचे स्मरण करतो. त्यांच्या संघर्षाने लाखो लोकांना आशा दिली.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.