Syed Mushtaq Ali Trophy Final 2025 Dainik Gomantak
देश

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Syed Mushtaq Ali Trophy Final 2025: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५' आता आपल्या अंतिम टप्प्यात आली आहे.

Sameer Amunekar

पुणे: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५' आता आपल्या अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेचा जेतेपदाचा थरार आज, १८ डिसेंबर रोजी पुण्याच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे. या ऐतिहासिक लढतीत अंकित कुमारच्या नेतृत्वाखालील हरियाणा आणि इशान किशनच्या नेतृत्वाखालील झारखंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत.

या अंतिम सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांनी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. झारखंडचा कर्णधार आणि धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याने ९ सामन्यांत ४१६ धावा फटकावल्या असून, त्यात २३ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. दुसरीकडे, हरियाणाचा कर्णधार अंकित कुमार याने १० सामन्यांत ४४८ धावा करत आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे या दोन फलंदाजांपैकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कधी आणि कुठे पाहता येईल सामना?

हरियाणा आणि झारखंड यांच्यातील हा हाय-व्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४:३० वाजता सुरू होईल, तर सामन्याचा टॉस ४:०० वाजता होईल. क्रिकेट प्रेमींना या सामन्याचा थेट आनंद 'स्टार स्पोर्ट्स' वाहिनीवर घेता येईल. तसेच, जे प्रेक्षक मोबाईलवर सामना पाहू इच्छितात, त्यांच्यासाठी 'जिओ हॉटस्टार' (Jio Hotstar) ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध असेल.

दोन्ही संघांची ताकद

दोन्ही संघांमध्ये आयपीएल गाजवणारे आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले खेळाडू आहेत. हरियाणाच्या ताफ्यात युझवेंद्र चहलसारखा अनुभवी फिरकीपटू आणि अंशुल कंबोजसारखे प्रतिभावान खेळाडू आहेत. तर झारखंडकडे विराट सिंह, कुमार कुशाग्र आणि अनुकूल रॉय यांसारखे मॅचविनर खेळाडू आहेत. पुण्याची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे आज धावांचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीला काळिमा! छत्तीसगडमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार; पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच निघाला नराधम

Viral Video: "मग आम्ही काय पाकिस्तानी आहोत का?", काश्मिरी माणसानं पर्यटकाला दिलं झणझणीत उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

लोकहितासाठी सरकार मागे हटण्यासही तयार! आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे- श्रीपाद नाईक

Lucky Gemstones: ग्रहांच्या 'बॅटिंग'वर तुम्ही मारणार सिक्सर! कामात फोकस आणि नफ्यात वाढ देणारी 5 लकी रत्ने; करिअरच्या मैदानात आता तुम्हीच ठरणार मॅन ऑफ द मॅच

मोपा विमानतळावर 3.16 कोटींचे अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT