Swami Prasad Maurya Dainik Gomantak
देश

Assembly Election 2022: 'मी निवडणूक हरलो पण...

फाजिलनगर मतदारसंघातून सपाचे उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांना भाजपच्या सुरेंद्र कुशवाह (Surendra Kushwaha) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्वत:चा आणि समाजवादी पक्षाचा पराभव होऊनही स्वामी प्रसाद मौर्य यांचा आत्मविश्वास ढळलेला नाही. कुशीनगरच्या फाजिलनगर मतदारसंघातून सपाचे उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांना भाजपच्या सुरेंद्र कुशवाह (Surendra Kushwaha) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. (Swami Prasad Maurya has said that he lost the election but will not leave the Samajwadi Party)

दरम्यान, माध्यमाशी बोलताना त्यांनी म्हटले की, 'मी निवडणूक हरलो पण आत्मविश्वास गमावलेला नाही. आम्ही विरोधी पक्षात राहून जनतेच्या विकासाचे मुद्दे मांडत राहू.' समाजवादी पक्षात (Samajwadi Party) प्रवेश करणे हा राजकीय निर्णय असून मी सपा सोडून कुठेही जाणार नाही. माझा पराभव झाला आहे, परंतु पराभव कोणत्या कारणांमुळे झाला याचा अभ्यास मी करेन.'

तसेच, भाजपला (Bjp) साप आणि स्वत:ला मुंगूस संबोधल्याबद्दलच्या वक्तव्यामुळे मौर्य चर्चेत आले आहेत. याविषयीच्या प्रश्नावर ते पुन्हा म्हणाले, 'हो मी मुंगूस आहे, भाजपरुपी सापाचा घात करेन, असे मी म्हटले होते. मी पुन्हा सांगतो की, सापामध्ये विष आहे, परंतु मुंगूस संधी मिळताच सापाला मारीन.

शिवाय, स्वामी प्रसाद यांची कन्या संघमित्रा या भाजपच्या खासदार आहेत. संघमित्रा यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले की, ''मी भाजपमध्येच राहणार आहे. माझे वडील माझे गुरु आहेत. ते माझा आदर्श आहेत आणि कायम राहतील. मी पुन्हा सांगते की, मी भाजपमध्येच राहणार आहे. माझ्या वडिलांवर हल्ला झाला म्हणून मी पुढे आले. परंतु मी भाजपवर हल्ला केला नाही तर दंगल करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. वडिलांवर हल्ला झाला तर मुलगी कशी गप्प राहील? बाकी जिंकणे आणि हरणे चालूच राहील.'' स्वामी प्रसाद मौर्य यांची कन्या भाजप खासदार संघमित्रा मेरी या भाजपच्या खासदार असूनही फाजीलनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांविरोधात त्यांनी मोर्चा खोलला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT