Assembly Election 2022 : उत्तराखंडसह पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

Assembly Election 2022 : उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी आणि पंजाबचे चरणजीत सिंह चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
cm pushkar singh dhami and cm charanjit singh channy
cm pushkar singh dhami and cm charanjit singh channydainik gomantak
Published on
Updated on

Assembly Election 2022 : देशातील पाच राज्यातील निवडणूकांचा निकाल लागला आहे. पंजाब वगळता उर्वरित चार राज्यांत भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला असून पाच राज्यापैकी ते प्रथम आपले सरकार स्थापन करणार आहे. तर दिल्ली नंतर पहिल्यांदाच देशात इतर राज्यात ही प्रथमच आपले सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. तर आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान हे 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. (cm pushkar singh dhami and cm charanjit singh channy have resigned after election assembly results)

दरम्यान उत्तराखंड विधानसभा (Uttarakhand Assembly)निवडणुकीत भाजपला (BJP) विजय मिळाला असलातरिही मुख्यमंत्री धामी यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. तर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्याही बाबतीत असेच काहीसे झाले असून यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये केवळ काँग्रेसचा (Congress) पराभव झाला नाही, तर ते स्वत: दोन्ही जागांवर पराभूत झाले.

यावेळी उत्तराखंडचे काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Chief Minister Pushkar Singh Dhami) म्हणाले, 'नवीन आदेश देण्यात आला असून आमचे काम पूर्ण झाले आहे. मी माझ्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा माननीय राज्यपालांकडे सोपवला आहे. जोपर्यंत नवे सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत तुम्ही काम करा, असे राज्यपालांनी म्हटले आहे. तर केंद्रात निरीक्षकांची नियुक्ती करण्याची आमची पद्धत आहे. ते राज्यात येऊन परिस्थिती पाहतील, त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल. आज फक्त मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे धामी म्हणाले.

cm pushkar singh dhami and cm charanjit singh channy
गोव्यात मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण? देवेंद्र फडणवीस म्हणतायत..

तर पंजाबचे (Panjab) मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी आज पंजाबच्या राज्यपालकडे जात त्यांची भेट घेतली. तसेच आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी चन्नी म्हणाले, 'मी माझा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. त्यांनी मला आणि मंत्रिमंडळाला नव्या सरकारच्या शपथविधीपर्यंत (Swearing) राहण्यास सांगितले असून जनतेचा जनादेश मला मान्य आहे.

तसेच चन्नी म्हणाले, त्यांनी 15वी विधानसभा (Assembly) बरखास्त करण्याची शिफारस त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपालांना (Governor) केली आहे. पण राज्यपालांनी त्यांना शपथविधी (Swearing) होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री (CM) म्हणून पदावर कायम राहण्यास सांगितले आहे. तसेच चन्नी यांनी, नवीन जे सरकार येईल ते काँग्रेस सरकारच्या (Congress government) काळात घेतलेले जनहिताचे निर्णय चालू ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मागच्या सरकारचे जनहिताचे निर्णय चालू ठेवण्यासंदर्भातील ठराव गेल्या मंत्रिमंडळात (cabinet) मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com