suryakumar yadav DainiK Gomantak
देश

Asia Cup 2025: आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध 'सूर्या'ची बॅट 'खामोश', आकडेवारी पाहून चाहते चिंतेत; माजी खेळाडूने उपस्थित केले सवाल!

Suryakumar Yadav Record: बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाने आपली तयारी सुरु केली आहे. टीम इंडिया 4 किंवा 5 सप्टेंबरला दुबईसाठी रवाना होईल.

Manish Jadhav

Suryakumar Yadav Record: बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाने आपली तयारी सुरु केली आहे. टीम इंडिया 4 किंवा 5 सप्टेंबरला दुबईसाठी रवाना होईल. या स्पर्धेतील सर्वात मोठा आणि रोमांचक मुकाबला 14 सप्टेंबर रोजी होणार आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने असतील. दोन्ही संघांसाठी हा सामना केवळ जिंकण्यापुरता मर्यादित नसून, तो त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. या मोठ्या सामन्यापूर्वीच एका माजी पाकिस्तानी खेळाडूने भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या पाकिस्तानविरुद्धच्या रेकॉर्ड प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पाकिस्तानविरुद्ध सूर्यकुमार यादव अपयशी ठरतोय?

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ज्याला 'मिस्टर 360 डिग्री' म्हणून ओळखले जाते, त्याचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड त्याच्या लौकिकाला साजेशा नाही. जगातील सर्वोत्तम टी-20 फलंदाजांपैकी एक असूनही, पाकिस्तानविरुद्ध तो पूर्णपणे अपयशी ठरलेला दिसतो. पाकिस्तानविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 12.80 च्या सरासरीने 64 धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या फक्त 18 आहे, तर त्याचा स्ट्राइक रेट 118.51 इतका कमी राहिला आहे. त्याच्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते की, पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर त्याला धावा करणे कठीण जात आहे.

आशिया कपमधील कामगिरीही निराशाजनक

एकंदरीत टी-20 सामन्यांप्रमाणेच, आशिया कपमध्येही सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्धची (Pakistan) कामगिरी निराशाजनक आहे. त्याने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 2 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 15.50 च्या सरासरीने फक्त 31 धावा केल्या आहेत. या स्पर्धेतील त्याचा पाकिस्तानविरुद्धचा सर्वोत्कृष्ट स्कोर 2022 च्या आशिया कपमध्ये 18 धावांचा होता. विशेष म्हणजे, त्याचा पाकिस्तानविरुद्धचा आशिया कपमधील स्ट्राइक रेट 110.71 इतका कमी आहे, जो त्याच्या नैसर्गिक आक्रमक शैलीच्या विरुद्ध आहे. हे आकडे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच चिंतेचा विषय आहेत, कारण तो संघाचा कर्णधार आणि एक प्रमुख फलंदाज आहे.

माजी खेळाडूनेही सूर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अली यांनी पीटीव्ही स्पोर्ट्सशी बोलताना सूर्यकुमार यादवच्या पाकिस्तानविरुद्धच्या खराब विक्रमावर टिप्पणी केली. "सूर्यकुमार जवळजवळ सर्व संघांविरुद्ध धावा करतो, पण पाकिस्तानविरुद्ध, कोणत्यातरी कारणाने, तो प्रभावी ठरत नाही. मग ते वेगवान गोलंदाजांचे आक्रमण असो किंवा दुसरे कोणतेही कारण असो, हा एक मुद्दा बनलेला आहे," असे त्यांनी म्हटले. अली यांच्या या विधानामुळे सूर्यकुमारच्या कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रित झाले आहे.

दुसरीकडे, 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात सूर्यकुमारला आपल्या बॅटची जादू पाकिस्तानविरुद्धही दाखवायची आहे. त्याच्यासाठी हा एक महत्त्वाचा सामना असेल, कारण त्याला केवळ संघाला विजय मिळवून द्यायचा नाही, तर आपल्या खराब विक्रमालाही सुधारायचे आहे. या सामन्यात त्याच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल. तो आपल्या नेहमीच्या शैलीत खेळून पाकिस्तानच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. हा सामना केवळ भारत-पाकिस्तानमधील rivalry नाही, तर सूर्यकुमार यादवच्या वैयक्तिक कामगिरीचीही एक परीक्षा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

SCROLL FOR NEXT