IND vs PAK: ‘इतकी धुलाई करतील की...' पाकिस्तानी दिग्गजाला भारतीय बॅटर्स धास्ती; आशिया कपमधील भारत-पाक सामन्यावर मोठं वक्तव्य

Basit Ali IND vs PAK: आशिया कप 2025 चे काउंटडाउन सुरु झाले आहे. 9 सप्टेंबरपासून 8 देशांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळणार आहे.
Basit Ali IND vs PAK
IND vs PAKDainik Gomantak
Published on
Updated on

Basit Ali IND vs PAK: आशिया कप 2025 चे काउंटडाउन सुरु झाले आहे. 9 सप्टेंबरपासून 8 देशांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळणार आहे. मात्र, क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक उत्सुकता 14 सप्टेंबर या तारखेची आहे. याच दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, भारत पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार देणार नाही ना, या चर्चांना उधाण आले आहे.

यापूर्वी, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये माजी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध दोन वेळा खेळण्यास नकार दिला होता. आता पाकिस्तानचे माजी खेळाडू अशीच आशा बाळगून आहेत की, भारतीय संघ आशिया कपमध्येही पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) खेळण्यास नकार देईल. माजी क्रिकेटपटू बासित अली यांच्या मते, जर भारतीय फलंदाज आणि पाकिस्तानचे गोलंदाज आमनेसामने आले, तर भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करतील.

Basit Ali IND vs PAK
Team India: टीम इंडियावर संकटाचे ढग! रोहित-विराट एकदिवसीय विश्वचषक खेळणार नाही? समोर आली मोठी अपडेट

‘भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकार द्यावा’

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर बासित अली यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “मी प्रार्थना करत आहे की, भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकार द्यावा. जसे त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये केले होते. भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजांची इतकी धुलाई करतील की, तुम्ही विचारही करु शकणार नाही.” आशिया कपमध्ये भारत (India) आणि पाकिस्तानची नियोजित लढत 14 सप्टेंबरला होणार आहे. बासित अली यांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तान संघाची खराब कामगिरी

पाकिस्तान क्रिकेट संघाची सध्याची स्थिती फारच वाईट आहे. नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला 1-2 असा मोठा पराभव पत्करावा लागला. मालिकेतील अंतिम सामन्यात तर वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा 203 धावांनी धुव्वा उडवला.

Basit Ali IND vs PAK
Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

दरम्यान, या संपूर्ण मालिकेत पाकिस्तानच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. मालिकेतील शेवटच्या सामन्यात संपूर्ण संघ केवळ 92 धावांवर गारद झाला. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सलमान अली आघा यांसारख्या स्टार फलंदाजांची फलंदाजी पत्त्यांसारखी विखुरली. पाकिस्तानच्या या खराब फॉर्ममुळे त्यांच्या माजी खेळाडूंना संघाच्या कामगिरीबद्दल भीती वाटत आहे. यामुळेच बासित अली यांनी भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देण्याचे आवाहन केले असावे, असे मानले जात आहे. पाकिस्तानचा संघ सध्या इतका कमकुवत झाला आहे की, त्यांना भारताविरुद्धच्या सामन्यात मानहानीकारक पराभवाची भीती वाटत आहे. यामुळेच त्यांच्या मनात भारताने हा सामना खेळू नये अशी इच्छा निर्माण झाली आहे, असे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com