Crime News Dainik Gomantak
देश

Gujarat Mass Suicide: गुजरात हादरलं! सुरतमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी केली आत्महत्या

Gujarat Mass Suicide: डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरत येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Gujarat Mass Suicide: डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरतमधील पालनपूर पाटिया परिसरात एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

कुटुंबातील सर्व सदस्यांनी विष प्राशन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर डायमंड सिटीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांना घटनास्थळावरुन एक सुसाईड नोटही मिळाली असून त्यात कोणाचेही नाव लिहिलेले नाही. मात्र, यामध्ये काही लोकांना पैसे दिल्याचा उल्लेख आहे.

फर्निचर व्यवसायात सक्रिय असलेल्या या कुटुंबाने काही लोकांना कर्ज दिल्याचेही समोर आले आहे. मात्र, पैसे परत न आल्याने कुटुंबप्रमुखाने हे पाऊल उचलले.

मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पालनपूर पाटिया परिसरातील सिद्धेश्वर अपार्टमेंटमधील जी-1, सी-2 या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मनीष सोळंकी यांनी कुटुंबातील आई-वडील, पत्नी आणि तीन मुलांना विष प्राशन करुन गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मनीष सोळंकी हे फर्निचर व्यवसायाशी निगडीत असल्यामुळे अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होते, असे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.

माहिती मिळताच नातेवाईक पोहोचले

सोळंकी कुटुंबीयांच्या आत्महत्येनंतर त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आहेत, मात्र ते काहीही बोलायला तयार नाहीत. एकाच कुटुंबातील सात जणांच्या आत्महत्येचे (Suicide) वृत्त समजताच आजूबाजूचे लोकही घटनास्थळी धावून आले.

मनीष भाईला लोकांकडून पैसे परत घ्यायचे होते, अशीही चर्चा स्थानिक लोकांमध्ये आहे. हे कुटुंब अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडल्याची माहितीही काही स्थानिकांनी दिली.

दरम्यान, या खळबळजनक घटनेत आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबाने फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला होता, मात्र फ्लॅट विकता न आल्याने कुटुंबाने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT