Surat Diamond Bourse  Dainik Gomantak
देश

Surat Diamond Bourse: पेंटागॉनला मागे टाकत भारतात उभारली जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग, जाणून घ्या काय आहे खास

Ashutosh Masgaunde

The World's largest office Building: अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनला मागे टाकत भारताने आता जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारतीचा मान मिळवला आहे.

80 वर्षांपासून पेंटागॉन ही जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत होती. पण, आता हा मान गुजरातमधील सुरत येथे बांधल्या जात असलेल्या इमारतीला मिळाला आहे, ज्यामध्ये हिरे व्यापार केंद्र असेल.

सुरत हे जगाची रत्नांची राजधानी म्हणून ओळखले जाते, जिथे जगातील 90% हिरे घडवले जातात. 65,000 हून अधिक हिरे व्यावसायिक नव्याने तयार झालेल्या सूरत डायमंड बाजारामध्ये एकत्र काम करू शकतील.

मिळालेल्या माहितीनुसार, 15 मजली इमारत 35 एकर जागेवर पसरलेली आहे आणि त्यात नऊ आयताकृती संरचना आहेत. ज्या एका केंद्रातून एकमेकांशी जोडलेल्या असतील.

ही भव्य इमारत बांधणाऱ्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यात 7.1 दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त मजल्यावरील जागा आहे. इमारतीचे बांधकाम चार वर्षांत पूर्ण होणार आहे.

नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या इमारतीचे अधिकृत उद्घाटन करणार असल्याचे वृत्त आहे. SDB वेबसाइटनुसार, व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये दोन दशलक्ष स्क्वेअर फूट पसरलेले मनोरंजन आणि पार्किंग क्षेत्र आहे.

या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश गढवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नवीन इमारत संकुल सुरू झाल्यानंतर हजारो लोकांना व्यवसाय करण्यासाठी रेल्वेने मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही.

मॉर्फोजेनेसिस कंपनीकडून इमारतीची रचना

आंतरराष्ट्रीय डिझाइन स्पर्धेनंतर भारतीय वास्तुविशारद कंपनी मॉर्फोजेनेसिसने या इमारतीचे डिझाइन केले आहे.

गढवी यांनी स्पष्ट केले की हा प्रकल्प पेंटागॉनला हरवण्याच्या स्पर्धेचा भाग नव्हता, परंतु मागणीच्या आधारे प्रकल्प आकारला गेला. इमारतीतील सर्व कार्यालये बांधकामापूर्वी हिरे कंपन्यांनी विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT