Supreme Court  Dainik Gomantak
देश

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

Supreme Court: राजकारण्यांसारखी नावे असलेल्या डमी उमेदवारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

Manish Jadhav

Supreme Court: पालकांनी आपल्या मुलांचे नाव लालू यादव किंवा राहुल गांधी ठेवले तर त्यांना कोण रोखू शकेल, असे निरीक्षण नोंदवत जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. राजकारण्यांसारखी नावे असलेल्या डमी उमेदवारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. अशा उमेदवारांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला सूचना द्याव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले की, जर एखाद्या व्यक्तीचे नाव लहानपणापासून राहुल गांधी (Rahul Gandhi) किंवा लालू यादव असेल तर तुम्ही त्याला निवडणूक लढवण्यापासून रोखाल का? पालकांना मुलांची अशी नावे ठेवण्यापासून रोखता येईल का? असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. साबू स्टीफन नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. मतदारांचा भ्रमनिरास व्हावा म्हणून निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी अशा उमेदवारांना जाणीवपूर्वक उभे केले जाते, असे त्यांचे म्हणणे होते.

याचिकेत म्हटले होते की, अनेक वेळा असे घडते की, प्रसिद्ध नेते अशा डमी नावामुळे फार कमी फरकाने निवडणूक हरतात. खरे तर न्यायालयाने निवडणूक आयोगाला (Election Commission) अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश द्यायला हवेत जेणेकरुन वस्तुस्थिती समोर येईल. मात्र ही याचिका सुनावणीस योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT