Supreme Court: 11,600 झाडे तोडण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयात; केंद्र अन् राज्य सरकारकडे मागितले उत्तर

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाकडे 11 हजारांहून अधिक झाडे तोडण्याविरोधात याचिका पोहोचली होती.
Supreme Court
Supreme Court Dainik Gomantak
Published on
Updated on

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाकडे 11 हजारांहून अधिक झाडे तोडण्याविरोधात याचिका पोहोचली. सर्वोच्च न्यायालयाने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) चेंबूरमधील रिफायनरी ते रायगडपर्यंत भूमिगत पाइपलाइन टाकण्यासाठी 11,600 झाडे तोडण्याची परवानगी दिल्याच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले.

दरम्यान, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्रातर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले. याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी पाणथळ जमीन नष्ट होत असल्याचा आरोप केला. मात्र, मेहता यांनी या याचिकेला विरोध करत सांगितले की, आम्ही यासंबंधीची माहिती घेऊ आणि परत न्यायालयात येऊ.

Supreme Court
Supreme Court: दिव्यांगांच्या आरक्षणाची याचिका CJI चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर; काय उत्तर मिळाले?

काय होती मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पर्यावरण कार्यकर्ते जोरु भथेना यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. चेंबूरमधील माहुल ते रायगड जिल्ह्यातील रसायनीपर्यंत भूमिगत पाइपलाइन टाकण्यासाठी झाडे तोडण्याविरोधातील त्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती. तज्ज्ञ संस्थांनी मान्यता देण्यापूर्वी विचारमंथन करायला हवे होते, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Supreme Court Stray Dog Directions
Supreme Court Madayi Water Case
Goa High Court Shivaji Maharaj statue
 Kavre Mayna Mining Block
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com