Supreme Court Dainik Gomantak
देश

Supreme Court: ''संशयाच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येणार नाही...''; 15 वर्षे जुन्या खून खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने 15 वर्षे जुन्या खून खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

Manish Jadhav

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने 15 वर्षे जुन्या खून खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता केली. निर्दोष मुक्तता करताना न्यायायलयाने म्हटले की, संशयाच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. या प्रकरणात, रक्ताने माखलेले शस्त्र जप्त केल्याच्या संशयावरुन आरोपीला दोषी ठरवता येईल का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आला होता. या कायदेशीर प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, परिस्थितीजन्य पुराव्याच्या बाबतीत, रक्ताने माखलेले शस्त्र जप्त करणे हा खुनाशी जोडल्याशिवाय दोषी ठरवण्याचा आधार असू शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, इतर पूरक पुरावे असल्याशिवाय केवळ संशयाच्या आधारे आरोपीला दोषी ठरवता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, हे एक स्थिर तत्व आहे की संशय कितीही पक्का असला तरी तो खटला सिद्ध करण्याची जागा घेऊ शकत नाही.

प्रकरण नेमकं काय आहे?

सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या खटल्यात फिर्यादी पक्षाने आरोप केला होता की, छत्तीसगड येथील रहिवासी आरोपी राजा नायकर याने 2009 मध्ये हा गुन्हा केला होता. त्याने मोठ्या धारदार चाकूने हा गुन्हा केला होता. तसेच मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधला होता. आरोपीच्या सांगण्यावरुन रक्ताने माखलेली शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु, चाकू आरोपीचाच होता हे वाजवी संशयापलीकडे फिर्यादी सिद्ध करु शकले नाही.

ट्रायल कोर्टाने शस्त्रे आणि ब्लँकेट्स जप्त केल्याच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. त्यानंतर उच्च न्यायालयाने देखील त्याला दोषी ठरवले आणि जे काही जप्त करण्यात आले त्याचे स्पष्टीकरण आरोपी देऊ शकत नाही, असे सांगितले होते. मात्र, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, एफएसएल अहवालात असे म्हटले आहे की, चाकूवर आढळलेले रक्त माणसाचे आहे, परंतु ते मृत व्यक्तीचे असल्याचे म्हटले नाही. ओपन प्लेसमधून रिकव्हरी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली आणि म्हटले की, वाजवी संशयापलीकडे खटला सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT