Justice L. Nageshwar Rao Twitter/ANI
देश

'खुलासा' न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी चित्रपटांमध्ये साकारली होती भूमिका

सर्वोच्च न्यायालयाचे पाचवे ज्येष्ठ न्यायमूर्ती एल नागेश्वर राव (Justice L. Nageshwar Rao) 7 जून रोजी निवृत्त होत आहेत.

दैनिक गोमन्तक

सर्वोच्च न्यायालयाचे पाचवे ज्येष्ठ न्यायमूर्ती एल नागेश्वर राव 7 जून रोजी निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी, त्यांना शुक्रवारी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनमध्ये निरोप देण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी खुलासा केला की, न्यायाधीश होण्यापूर्वी नागेश्वर राव यांनी ‘कानून अपना अपना’ या बॉलिवूड चित्रपटासह अनेक चित्रपटांमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम केले होते. हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता.

न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी न्यायाधीश होण्याआधी चित्रपटांमध्ये केली भूमिका केली होती. न्यायाधीश होण्यापूर्वी नागेश्वर राव यांनी ‘कानून अपना अपना’ या बॉलिवूड (Bollywood) चित्रपटात इन्स्पेक्टर म्हणून काम केल्याचे रहस्य निरोप समारंभात उघडले.

न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांनी त्यांच्या निरोपाच्या प्रसंगी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होऊ नये. हा खूपच कमी कालावधी आहे. न्यायाधीशांना इथल्या कामाची सवय होईपर्यंत सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडण्याची वेळ येते. न्यायाधीशांना किमान 7-8 वर्षे येथे काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, असे न्यायमूर्ती राव म्हणाले.

न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात निरोप देण्यात आला. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी न्यायमूर्ती राव यांनी दिलेल्या अनेक ऐतिहासिक निकालांबद्दल त्यांचे कौतुक केले. यादरम्यान वकिलांनी त्याचे क्रिकेट आणि सिनेमाशी असलेले संबंधही उघड केले.

न्यायमूर्ती राव यांनी आंध्र प्रदेशसाठी (Andhra Pradesh) रणजी ट्रॉफी खेळली आणि काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयात बढती मिळालेले न्यायमूर्ती राव म्हणाले, मला सक्रिय राहायला आवडते आणि खेळाने मला आयुष्यात खूप काही शिकवले आहे. तरुणपणी मी थिएटर पण करायचो, असे न्यायमुर्ती राव यांनी सांगतिले.

CJI म्हणाले, न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती राव यांनी कायद्याचा अर्थ लावण्यात आणि राज्यघटनेचे अनेक उल्लेखनीय बाबींवर व्याख्या करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नुकतेच न्यायमूर्ती राव यांनी जेकब पुलिएल प्रकरणात निकाल दिला, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही व्यक्तीला लसीकरण करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी राजीव गांधी हत्येतील दोषी एजी पेरारिवलनच्या सुटकेचा निर्णयही दिला.

न्यायाधीशांचा कार्यकाळ सात ते आठ वर्षांचा असावा

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होऊ नये. ते खूपच कमी आहे. न्यायाधीशांना इथल्या कामाची सवय होईपर्यंत सर्वोच्च न्यायालय सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. न्यायाधीशांना किमान 7-8 वर्षे आणखी येथे काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. असे न्यायमूर्ती राव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

Damodar Saptah: ..पंढरीच्‍या वारकऱ्यांसाठी जशी विठूमाउली, तसा गोव्यातील भाविकांसाठी दामबाब! आख्‍यायिकांनी भरलेला 'देव दामोदर'

Morjim Beach: 'मोरजी किनाऱ्यावरील सुशोभीकरण थांबवा'! गोवा खंडपीठाचा आदेश; GTDC प्रकल्पाला खीळ

Career and Money Horoscope: करिअरमध्ये यश, पैशांत वाढ! वाचा दैनिक भविष्य; जाणून घ्या ग्रहांचे संकेत

Cutbona Jetty: 'माशे मेंळ्ळे ना'! समुद्र अजून खवळलेला, कुटबण जेटीवर मजूर परतले; ट्रॉलरमालकांची वाढली लगबग

SCROLL FOR NEXT