देशात वाढत चाललेली महागाईने सामान्य नागरिकांचे गणित कोलमडले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. देशात रुपयाची दररोज घसरण होत आहे, महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना व मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम भाजपाकडून सुरु आहे.असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. (Modi government could not solve the problems of inflation, farmers, poor - Nana Patole )
प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार हे सर्व आघाड्यांवर कुचकामी ठरले आहे. महागाई, शेतकरी, कामगार, गरिबांचे प्रश्न मोदी सरकार सोडवू शकले नाही. काँग्रेस पक्षाला आजच्या परिस्थितीची चिंता वाटते म्हणून जनतेला न्याय कसा मिळेल यासाठी आमची लढाई सुरु आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्याचे निर्णय घेतले पाहिजेत मात्र त्याकडे दुर्लक्ष करून धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. हिंदू धर्माबद्दल आम्हाला दुसऱ्यांकडून शिकण्याची गरज नाही, माणुसकी हा खरा धर्म असून ती जोपासली पाहिजे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. जनतेचे प्रश्नच सोडवणार नसले तर ते सरकार काय कामाचे ? असंही नाना पटोलेंनी म्हटलंय.
देशाच्या तिजोरात सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रातून जातो पण केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देताना मात्र हात आखडता घेते, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. केंद्र सरकारनेच इंधनावरील करातून 26 लाख कोटी रुपये कमावले आहेत आणि राज्य सरकारने कर कमी करावेत अशी अपेक्षा केंद्र सरकार व भाजपा करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.