Supreme Court Dainik Gomantak
देश

Jahangirpuri हिंसाचाराची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्याची मागणी SCने फेटाळली

न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली आहे. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.

दैनिक गोमन्तक

16 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मिरवणूकीच्या वेळी दोन गटांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर जहांगीरपुरी (jahangirpuri) जातीय हिंसाचाराने हादरली आहे. देशाच्या विविध भागात रामनवमी (Rama Navami) आणि हनुमान जन्मोत्सवादरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Supreme Court has rejected the demand for an inquiry into the Jahangirpuri violence led by a retired judge)

या प्रकरणावर आज सुनावणी झाली आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली आहे. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. वकील विशाल तिवारी म्हणाले की, हिंसाचाराचा तपास एकतर्फीच होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली तपास करण्याची गरज असल्याचे यावेळी वकील म्हणाले.

त्यावर न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी याचिका फेटाळून लावली आणि सांगितले की, तुम्हाला भारताचे माजी सरन्यायाधीश (CJI) तपासावरती देखरेख ठेवायची आहे. CJI मुक्त कोण आहे? ज्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत, अशा मागण्या करू नका, आम्ही तुमची ही याचिका फेटाळत आहोत. त्याचवेळी याचिकाकर्ते विशाल तिवारी यांनी मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील बुलडोझर कारवाईची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणीही देखील केली होती.

देशाच्या विविध भागात हिंसाचार

10 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी देशभरात हिंसाचार झाला. याशिवाय हनुमान जयंतीच्या दिवशीही हिंसाचार झाला. अनेक राज्यांमध्ये निघालेल्या मिरवणुकांवर दगडफेकीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर परिस्थिती अनियंत्रित झाली होती. या काळात एकूण 10 राज्यांमध्ये हिंसाचार झाला आहे. या घटनांमध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि लोक जखमी झाले आहेत. 10 एप्रिल रोजी गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये जातीय हिंसाचाराच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर 6 एप्रिल रोजी दिल्ली, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये ही कारवाई करण्यात आली होती. त्याचवेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या बातम्या समोर आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT