Bilkis Bano Dainik Gomantak
देश

Bilkis Bano Case: दोषींच्या सुटकेविरोधात SC मध्ये याचिका, लवकरच स्थापन होणार विशेष खंडपीठ

Supreme Court: सरन्यायाधीश डी.वाय. न्यायमूर्ती चद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बिल्किसच्या वकील शोभा गुप्ता यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली.

Manish Jadhav

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो प्रकरणाच्या सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी बिल्किस बानोच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले की, यासाठी लवकरच विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येईल.

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बिल्किसच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली.

दरम्यान, वकील शोभा गुप्ता यांनी या प्रकरणावर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली होती. बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींच्या मुदतपूर्व सुटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याचिकाकर्त्याला आश्वस्त केले की, आम्ही हे प्रकरण लवकरच सूचिबद्ध करेन.

11 दोषींची सुटका करण्यात आली

बिल्किस बानोने 11 दोषींची निर्दोष मुक्तता किंवा मुदतपूर्व सुटकेला आव्हान देणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. 15 ऑगस्ट रोजी गुजरात सरकारने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींची सुटका केली होती. दुसरीकडे, 2008 मध्ये शिक्षेच्या वेळी गुजरातमध्ये (Gujarat) प्रचलित असलेल्या माफी धोरणानुसार सरकारने सर्व 11 दोषींची सुटका केली.

बिल्किसवर दंगलीदरम्यान सामूहिक बलात्काराचा आरोप

2002 च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानोवर कथितरित्या सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला मरण्यासाठी सोडण्यात आले. वडोदरा येथे दंगलखोरांनी तिच्या कुटुंबावर हल्ला केला, तेव्हा बिल्किस बानो ही पाच महिन्यांची गर्भवती होती.

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने 13 डिसेंबर रोजी बिल्किसची पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले होते की, 'आमच्या मते, 13 मे 2022 रोजी दिलेल्या निकालात कोणतीही त्रुटी दिसत नाही, ज्यामुळे पुनरावलोकन केले जाऊ शकते.'

15 ऑगस्ट रोजी दोषींची सुटका करण्यात आली होती

गुजरात सरकारने 15 ऑगस्ट रोजी 11 दोषींची शिक्षा माफ करुन त्यांची सुटका केली. 15 ऑगस्ट 2022 रोजी कैद्यांची सुटका झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. गोध्रा दंगलीनंतर बिल्किस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई 'GAY', डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'रिपोर्ट वाचून मला हसू आलं'

Hidden Gems in Goa: उन्हाळ्याच्या उकाड्यात गोव्याचा गारवा! एप्रिल-मेमध्ये सहलीचे नियोजन करताय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Tecno Spark 50 5G: 6500 mAh बॅटरी, 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा...टेक्नोने लाँच केला नवा स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फीचर्स

Viral Video: शिंगाला शिंग भिडलं अन् उडाला थरार! भररस्त्यात सांडांची थरकाप उडवणारी झुंज; युजर म्हणाले, ''हा नक्कीच गर्लफ्रेंडचा मॅटर दिसतोय''

Nepal PM Oath Ceremony: नेपाळमध्ये 'बालेन' युगाचा उदय! रॅपर ते PM... बालेंद्र शाह यांनी घेतली 47 वे पंतप्रधान म्हणून शपथ

SCROLL FOR NEXT