Sunny Leone's photo is on admit card in the Uttar Pradesh police recruitment exam:
उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षेत एका प्रवेशपत्रावरून खळबळ उडाली आहे. या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा फोटो आहे. हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याप्रकरणी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. राज्यात उमेदवारांच्या नावावर सनी लिओनीचे नाव आणि फोटो असलेली प्रवेशपत्रे समोर आली आहेत. ज्या उमेदवाराच्या प्रवेश पत्रावर सनी लिओनीचा फोटो आहेत तो उमेदवार महोबा जिल्ह्यातील आहे.
या अनोख्या प्रकरणात, उमेदवारांचे म्हणणे आहे की, प्रवेशपत्रात सनी लिओनीचे नाव आणि फोटो कसा आला याबद्दल कोणतीही माहिती नाही.
यामागे सलवार गँगचा हात असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे अधिकारीही कमालीचे चिंतेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे.
कन्नौज जिल्ह्यात, सनी लिओनीच्या नावाने जारी केलेले प्रवेशपत्र महोबा जिल्ह्यातील रगौलिया बुजुर्ग गावातील रहिवासी धर्मेंद्र कुमारचे असल्याचे आढळून आले आहे.
हे प्रकरण चर्चेत असताना, रविवारी गुन्हे शाखेने उमेदवाराच्या रगौलिया बुजुर्ग या गावात जाऊन त्याची चौकशी केली.
उमेदवार धर्मेंद्र कुमार याने माहिती देताना सांगितले की, त्याने महोबा येथील कॉम्प्युटर कॅफेमधून पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. तो कन्नौज येथील परीक्षा केंद्रावर आला, मात्र तेथे प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा फोटो पाहिल्यानंतर तो परीक्षा देण्यासाठी गेलाच नाही.
याप्रकरणी रविवारी गावात पोहोचलेल्या पोलिस पथकाने उमेदवाराची कसून चौकशी केली. तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.
माहिती देताना अप्पर पोलिस अधीक्षक सत्यम म्हणाले की, तपास सुरू आहे. कोणीतरी चुकीच्या नावाने अर्ज केला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीचे नाव आणि फोटोसह प्रवेशपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर चर्चेचा बाजार चांगलाच तापला आहे. काही जण तांत्रिक त्रुटींकडे लक्ष वेधत आहेत तर काही जण सनी लिओनला पोलीस भरतीत सामील होऊन पोलीस होणार असल्याचे सांगून त्यांची खरडपट्टी काढत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.