Farmers Protest: शेतकऱ्यांनी धुडकावला सरकारचा प्रस्ताव, 23 पिकांवर केली एमएसपीची मागणी

Farmers Protest Latest News: केंद्र सरकारचा पाच पिकांवर एमएसपीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावून लावला आहे.
Farmers
FarmersDainik Gomantak
Published on
Updated on

Farmers Protest Latest News: केंद्र सरकारचा पाच पिकांवर एमएसपीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावून लावला आहे. शेतकऱ्यांनी 23 पिकांवर एमएसपीची मागणी करत सरकारच्या प्रस्तावात काहीच नसल्याचे म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी नेत्यांपैकी एक सरवनसिंग पंढेर म्हणाले की, सरकारचा हेतू सदोष आहे. सरकारशी असहमती व्यक्त करत शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचेही जाहीर केले आहे. 21 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

'एमएसपीचा सरकारवर बोजा पडणार नाही'

दरम्यान, एमएसपी कायद्याचा सरकारवर कोणताही बोजा पडत नसल्याचे शेतकरी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. शेतकरी आंदोलनात सहभागी संघटनांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला. ते म्हणाले की, सरकारचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही.

23 पिकांवर एमएसपी लागू व्हावा

शेतकरी नेते सरवनसिंग पंढेर म्हणाले की, केंद्र सरकारने देशभरातील 23 पिकांवर एमएसपी लागू करावा. सरकारचा हा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, आम्ही तो रद्द करतो. आम्हाला MSP वर गॅरंटी पाहिजे आहे.

'शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी सरकार गंभीर नाही'

पंढेर पुढे म्हणाले की, ''आम्ही बैठकीला उपस्थित राहत आहोत. मात्र, सरकारचे मंत्री बैठकीला 3 तास उशिरा येतात. यावरुन भारत सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी शांततेने दिल्लीकडे कूच करतील.''

हरियाणात इंटरनेट बंदी 20 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली

हरियाणाच्या सीमेवर शेतकरी सातत्याने आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनात आतापर्यंत तीन शेतकरी आणि एका जीआरपी निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. पंजाब आणि हरियाणातील प्रत्येकी सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. हरियाणात इंटरनेट बंदी 20 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com