Election Commission Dainik Gomantak
देश

Election Commission: सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त

Sukbhbir Sandhu, Gyanesh Kumar appointed new election commissioners: नोकरशहा सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आज दुपारी ही माहिती दिली.

Manish Jadhav

Sukbhbir Sandhu, Gyanesh Kumar appointed new election commissioners:

माजी नोकरशहा सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारआधीच लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आज दुपारी माध्यमांना ही माहिती दिली. अधीर रंजन चौधरी हे देखील निवडणूक आयुक्तांच्या निवडीशी संबंधित समितीचा एक भाग आहेत.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीने दोन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी बैठक घेतली. बैठकीनंतर समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी म्हणाले की, समितीसमोर सहा नावे ठेवण्यात आली होती, त्यापैकी या दोन नावांना मंजुरी देण्यात आली आहे. अधीर रंजन पुढे म्हणाले की, माजी नोकरशहा एसएस संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्त म्हणून नावे निश्चित करण्यात आली आहेत.

दरम्यान, सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार हे 1988 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. संधू हे आयएएसच्या उत्तराखंड कॅडरचे आहेत, तर कुमार केरळ कॅडरचे आहेत. संधू यांनी यापूर्वी उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष अशा महत्त्वाच्या सरकारी पदांवर काम केले आहे. तर कुमार यांनी संसदीय कामकाज मंत्रालय आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंत्रालयात सचिव म्हणून काम केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान आणि अधीर रंजन चौधरी यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही या बैठकीला उपस्थित होते. निवड समितीमध्ये सरन्यायाधीशांच्या जागी केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या कायद्यावरुन काँग्रेस (Congress) नेत्याने केंद्रावर निशाणा साधला. या समितीत भारताचे सरन्यायाधीश असायला हवे होते, असे सांगून ते म्हणाले की, गेल्या वर्षी आणलेल्या नव्या कायद्यामुळे ही बैठक केवळ औपचारिकतेपर्यंत मर्यादित राहिली. पॅनेलमध्ये सरकार बहुमतात आहे. त्यांना जे पाहिजे ते आहे."

चौधरी यांनी पुढे सांगितले की, ''काल रात्री त्यांना 212 नावांची यादी पाठवण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की, "मी काल रात्री दिल्लीला पोहोचलो आणि आज दुपारी मीटिंग होती. मला 212 नावं देण्यात आली. एका दिवसात इतक्या उमेदवारांची पडताळणी कशी काय करु शकतो? बैठकीपूर्वी 6 नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली. त्यामुळे अखेर त्यांनी त्यांना हवा असलेला उमेदवार निवडला.''

दुसरीकडे, आदल्या दिवशी निवडणूक आयोगाच्या दोन नवीन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक झाली होती. ही बैठक यापूर्वी 15 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होणार होती. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे गेल्या महिन्यात निवृत्त झाल्याने आणि शुक्रवारी अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिल्याने निवडणूक आयुक्तांची दोन पदे रिक्त झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT