भारताची ओडिशाच्या किनारपट्टीवर अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 

Dainik Gomantak

देश

भारताची ओडिशाच्या किनारपट्टीवर अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने डिझाईन आणि विकसित केले ऑन याचा पल्ला 1000 ते 2000 किमी दरम्यान आहे.

दैनिक गोमन्तक

भारताने आज ओडिशाच्या (Odisha) बालासोर किनाऱ्यावर अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी (Test) घेतली. अण्वस्त्र (Nuclear) वाहून नेण्यासाठी सक्षम असलेल्या अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रांची हि प्रगत आवृत्ती आहे. जमिनीवरून जमिनिवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा पल्ला 1000 ते 2000 किमी आहे. या क्षेपणास्त्राची (Missiles) रचना आणि विकास संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केली आहे.

अधिकाऱ्याने माहिती दिली कि चाचणी दरम्यान अग्नी प्राईम क्षेपणास्त्रात अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. याने सर्व मिशनचे लक्ष्य उच्च पातळीच्या अचूकतेने पूर्ण केले. अग्नी प्राईम हे अति आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले क्षेपणास्त्र अत्यंत कमी वजनाचे आहे.

या आठवड्यात भारताने (India) ओडिशाच्या किनार पट्टीवरील कलाम बेटावरून सुपरसोनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पेडो सिस्टीम (SMAT) यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. DRDO ने सांगितले कि हि प्रणाली पाणीबुडीविरोधी (Submarine) युद्ध क्षमता वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जी पारंपारिक टॉर्पेडोच्या श्रेणीपेक्षा खूप जास्त आहे. डीआरडीओने एका निवेदनात म्हंटले की, "चाचणी योजनेनुसार झाली. या दरम्यान इलेक्ट्रो ऑप्टिक टेलीमेट्री सिस्टीम, डाउन रेंज इंस्ट्रुमेंटेशन आणि डाउन रेंज शिपसह विविध रडारद्वारे संपूर्ण प्रक्षेपणाचे निरीक्षण केले गेले.क्षेपणास्त्रामध्ये टॉर्पेडो , पॅराशूट वितरण प्रणाली होती.

अग्नी क्षेपणास्त्र आणि त्यांची श्रेणी

* SLV-3 बूस्टर यामध्ये वापरण्यात आले आहे, त्याची रेंज 700 किमी आहे. त्यात द्रव इंधन भरले जाते. त्याची पहिली चाचणी 28 मार्च 2010 रोजी झाली. हे क्षेपणास्त्र आण्विक साहित्य वाहून नेण्यास सक्षम आहे.

* अग्नी 2 : या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची रेंज ३००० किमी आहे. ते १००० कोलोपर्यंत साहित्य वाहून नेण्यास सक्षम आहे.

* अग्नी 3 : 'अग्नी 3' 3000 किमीपर्यंत जाऊ शकते. हे 600 ते 1800 किलोग्रॅमपर्यंतच्या अणु सामग्रीसह सुसज्ज असू शकते.

अग्नी 4 : हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे.

अग्नी 5 : अग्नी 5 ची पहिली चाचणी एप्रिल 2012 रोजी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने भारतीय सैन्याला संपूर्ण चीनला लक्ष्य करता आले. त्याहची श्रेणी 5500 किमी आहे, जी 7000 किमीपर्यंत वाढवता येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT