Arrest Dainik Gomantak
देश

STFची बंगालमध्ये मोठी कारवाई, 'अल कायदा'च्या 2 दहशतवाद्यांना अटक

पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने परगणा जिल्ह्यातून अल कायदाच्या (Al-Qaeda) दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली

दैनिक गोमन्तक

West Bengal: पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने (STF) बुधवारी रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यातून अल कायदाच्या (Al-Qaeda) दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. मिळालेल्या एका गुप्त माहितीवर कारवाई करत आहे. मिळालेल्या एका गुप्त माहितीवर कारवाई करत, एसटीएफ अधिकार्‍यांनी बुधवारी रात्री उत्तर 24 परगणा येथील सरकारी पोलीस स्टेशन क्षेत्रातील खरीबारी येथे शोध सुरू केला आणि दोघांनाही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी एक दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील गंगारामपूरचा रहिवासी आहे, तर दुसरा हुगळी जिल्ह्यातील आरामबागचा रहिवासी आहे. त्यांच्याकडून अनेक कागदपत्रे सापडली आहेत.

एक मोठा कट रचणार होता

एसटीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही काही मोठा कट रचण्याचा प्रयत्न करत होते. दहशतवाद्यांविरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दोघांची चौकशी केल्यानंतर 17 जणांची नावे समोर आल्याचे वृत्त आहे. अटक करण्यात आलेले दोघेही अल-कायदाचे दहशतवादी आहेत. आरोपी अनेक वर्षांपासून दहशतवादी गटांसाठी काम करत असल्याची माहिती आहे.

'अल कायदा' इंटरनेटवर अपप्रचार करत आहे

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेटला पराभूत करण्यासाठी अल-कायदाने इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर प्रचार मोहीम सुरू केली आहे. ही संघटना विविध वेबसाईटच्या माध्यमातून जिहादचे विष पसरवत आहे. सेंट्रल इंटेलिजन्सचे म्हणणे आहे की, जर त्या साइट्स ओळखल्या गेल्या आणि बंद केल्या तर अल-कायदा दुसऱ्या नावाने जिहादी वेबसाइट उघडते. त्यापैकी 12 हून अधिक बंगाली आहेत. त्या वेबसाइट्स संघटनेच्या प्रमुख जिहादी नेत्यांच्या अरबी भाषणांचे बंगालीमध्ये भाषांतर करून अल-कायदाच्या विचारसरणीचा प्रचार करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT