Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी लालू यादव यांचे दोन्ही पुत्र, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादवही उपस्थित होते. दिल्ली एम्समधून उपचार करुन लालू यादव आज संध्याकाळी बिहारला परतले.
हुकूमशहा सरकार हटवावे लागेल : लालू यादव
तत्पूर्वी, लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आज त्यांच्या जुन्या शैलीत दिसले. बिहारचे बदललेले राजकीय समीकरण आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतर लालू पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'मोदींना पहिल्यांदा हटवावे लागेल.' यापूर्वी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते सुशील मोदी यांना 'लबाड' म्हटले होते.
प्रकृतीच्या कारणास्तव शपथविधीला उपस्थित राहू शकलो नाही
नवीन जेडीयू-महागठबंधन सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आरजेडी सुप्रीमो उपस्थित राहू शकले नाहीत. याआधी ते शपथविधीला उपस्थित राहणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत.
राबरी निवासस्थानी पडल्याने खांदा फ्रॅक्चर झाला
लालूंना गेल्या महिन्यात 6 जुलै रोजी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पाटणा येथील राबरी निवासस्थानी पायऱ्यांवरुन पडल्याने त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले होते. यानंतर ते खासदार कन्या मीसा भारती यांच्या दिल्लीतील (Delhi) निवासस्थानी होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.