Gold Mine
Gold Mine Dainik Gomantak
देश

Gold Mine Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा सापडल्या सोन्याच्या खाणी

दैनिक गोमन्तक

Gold Mine Maharashtra : गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी मिळाल्याची माहीती समोर आली होती. आता नागपुरमध्ये सोन्याचे भांडार मिळाल्याचे समोर आले आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) ही माहीती दिली आहे . भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने पश्चिमेला परसोडीच्या भागात सोन्याचे भांडार मिळण्याच्या शक्यता वर्तवल्या आहेत.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने प्रस्तुत केलेल्या रिपोर्टनुसार परसोडीसोबतच किटाली, मरुपार आणि भंडारा जिल्ह्यातल्या भीमसेन किल्याजवळ या सोन्याच्या खाणी मिळणाच्या शक्यता वर्तवल्या आहेत. या सर्वेक्षणानुसार भिवापुर परिसरात सोन्याच्या खाणी मिळण्याच्या संभावना असल्याचे म्हटले आहे . त्याबरोबरच याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सरकारला जबाबदार ठरवले आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने राज्य सरकारला याआधीच खोदण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शासनाने या रिपोर्टकडे दुर्लक्ष करुन खोदकाम करणे गरजेचे समजले नाही. याआधी चंद्रपुर ( Chandrapur )जिल्ह्यातल्या बामणी आणि मिंझरी परिसरात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत.

दरम्यान, शासन आता सोन्याच्या खाणींबद्दल गंभीर दिसुन येत आहे. महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी याबाबत सक्रियता दाखवली आहे. भारतात सोन्याचे महत्व पुर्वीपासुन दिसुन येते. भारत इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करते . त्यामुळे सोन्याच्या खाणी सापडणे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपुर्ण देशासाठी महत्वाचे मानले जात आहे .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT