Lalu Yadav: लाडक्या बाबांसाठी मुलीचा धाडसी निर्णय; लालूंचे सिंगापूरमध्ये होणार किडनी प्रत्यारोपण

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्समध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.
Lalu Yadav
Lalu YadavDainik Gomantak

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या किडनीचे आज (05 डिसेंबर) सिंगापूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी लालू यादव यांचे आज किडनी प्रत्यारोपण (Kidney Transplant) होणार आहे. अशी माहिती दिली आहे. यापूर्वी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव (Bihar DCM Tejaswi Yadav) हेही सिंगापूरला पोहोचले आहेत.

Lalu Yadav
Tillari Canal: गोव्याला पाणीपुरवठा करणारा तिलारी कालवा 22 वर्षांनंतर पहिल्यांदाच होणार बंद, कारण काय?

लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य लालू यादव यांना किडनी दान करणार आहेत. 'माझ्यासाठी एवढचं म्हत्वाचे आहे, तुमचे स्वास्थ माझ्यासाठी आयुष्य आहे.' असे ट्विट रोहिणी यांनी केले आहे. दरम्यान, आज सकाळी किडनी प्रत्यारोपण करण्यापूर्वी रोहिणी यांनी अजून एक ट्विट करत, 'रेडी टू रॉक अँन्ड रोल, मला शुभेच्छा द्या.' असे ट्विट त्यांनी केले आहे.

Lalu Yadav
Auragabad: संतापजनक ! वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण, औरंगाबादमधील घटना

लालू यादव यांची किडनी अनेक दिवसांपासून खराब आहे आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजारासह इतरही अनेक आजारांनी त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्समध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्यानंतर लालू सिंगापूरला गेले, आता आज त्यांचे किडनी प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. प्रत्यारोपणानंतर लालू यादव तब्येत अधिक सुधारू शकते.

Lalu Yadav
Goa Corona Update: मोठा दिलासा! आठ महिन्यानंतर गोव्यात शून्य कोरोना रूग्णांची नोंद

कोण आहेत रोहिणी आचार्य?

लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांचे लग्न सॉफ्टवेअर अभियंता समरेश सिंग यांच्याशी झाले. रोहिणीचा पती समरेश सिंग सिंगापूरमध्ये स्थायिक आहे. सध्या ते एव्हरकोर पार्टनर्स नावाच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. याआधी रोहिणी यांनी जीएमआर आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत गुंतवणूक बँकर म्हणून काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com